Take a fresh look at your lifestyle.

अखेर राफेल घोटाळयाची चौकशी सुरू; राहुल गांधी यांनी केले होते ‘महत्वाचे’ आरोप..!

दिल्ली : राफेल विमान खरेदीच्या प्रकरणातील घोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला अजूनही सर्वांना शांत करणारे असे ठोस प्रत्युत्तर देणे शक्य झालेले नाही. अशावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी वेळोवेळी या खरेदी करारामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यातच आता या घोटाळ्याची भारतात चौकशी होत नसतानाच फ्रांस देशात मात्र चौकशी सुरू झालेली आहे.

Advertisement

राहुल गांधी यांनी मोदी सरकार याप्रकरणी टिकेची झोड उठवली होती. त्यांनी संबंधित प्रकरणात मोदी यांनी माझ्या तीन प्रश्नांचे उत्तरे द्यावे अशी एका पत्राव्दारे मागणी केली होती. त्यावर भाजपकडून कॉंग्रेसला शांत करणारे उत्तर आलेले नाही. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे फ्रान्सच्या पीएनएफने (पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज) सांगितले असून फ्रान्सच्या आजी माजी पंतप्रधानांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

Advertisement

फ्रान्स आणि भारतात राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 59 हजार कोटी रुपयांचा करार झाला होता. यावेळी फ्रांस्वा ओलांद हे पंतप्रधान तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे अर्थमंत्री असून त्यांनीच या करारावर साईन केली होती. त्यामुळे आजी माजी पंतप्रधानांची चौकशी केली जाणार असून त्यांना याची उत्तरे द्यावी लागणार आहेत. करारानुसार भारताला फ्रान्सकडून 36 राफेल मिळणार होते. परंतु, भारतीय वायूसेनेला आतापर्यंत केवळ 21 राफेल लढाऊ विमान उपलब्ध झाले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply