Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधी यांच्या ‘त्या’ दुखण्यावर भाजपची टीका; पहा कोणत्या लसबाबत म्हटलेय त्यांनी

भोपाळ : कोरोना प्रतिबंधक लसींच्या मुद्द्यावर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना लसींबाबत केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर मोदी सरकारचे मंत्री चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही या मुद्द्यावर राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

राहुल गांधी यांनी कोरोना प्रतिबंधक लसींबाबत केलेले ट्विट भाजप नेत्यांना चांगलेच झोंबले आहे. या ट्विटला आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, की अज्ञानास नष्ट करण्यासाठी तर कोणतीही लस नाही. सर्वजण पाहत आहेत, की देशात रोज किती लसीकरण होत आहे. त्यानंतरही जर अशी विधाने केली जात असतील तर यास अज्ञानता असेच म्हणावे लागेल, दुसरे काही नाही.

Advertisement

याआधी राहुल गांधी यांनी जुलै आला, तरी लस आली नाही, असे ट्विट करत केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली होती. मात्र त्यांचे हे ट्विट काही मंत्र्यांना रुचले नाही. मग, त्यांनीही तितक्याच जोरदारपणे राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, की मी कालच जुलै महिन्यात किती लसी उपलब्ध होतील याची माहिती दिली आहे. मग, राहुल गांधी यांना नेमकी काय समस्या आहे, त्यांना समजत नाही का, अहंकार आणि अज्ञानाच्या व्हायरससाठी कोणतीही लस नाही. काँग्रेसला आपल्या नेतृत्वात बदल करण्याबाबत विचार करण्याची गरज आहे.

Advertisement

तर दुसरीकडे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की कोरोना लसींचे 12 कोटी डोस जुलै महिन्यात उपलब्ध होणार आहेत. जे खासगी दवाखान्यांच्या पुरवठ्यापेक्षा वेगळे आहेत. राज्यांना 15 दिवस आधीच याबाबत माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधी यांना समजले पाहिजे की कोरोना विरूद्धच्या संघर्षात राजकारण करणे योग्य नाही, असे म्हटले होते.

Advertisement

दरम्यान, कोरोना काळात लसींच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेला वाद अजूनही मिटलेला नाही. लसी वेळेवर मिळत नसल्याची तक्रार राज्ये करत असली तरी केंद्र सरकार मात्र आपल्या दाव्यावर ठाम आहे. आताही केंद्र सरकारने राज्यांकडे जवळपास 1.24 कोटींपेक्षा जास्त लसी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. आता 21 जूनपासून सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणास सुरुवात झाली आहे. यासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देत आहे. राज्यांनी लसीकरण सुरू केले असले तरी पुन्हा लसींच्या कमतरतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंजाब आणि छत्तीसगड राज्यांनी याबाबत केंद्र सरकारला माहिती देत पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

त्यानंतर आता आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे की राज्यात लसींची केमतरता असल्याचे केंद्र सरकार आजही मान्य करण्यास तयार नाही. आजही लसीकरणासाठी 1.24 कोटीपेक्षा जास्त लसींचे डोस शिल्लक आहेत. तसेच राज्यांना आणखी 94 लाख 66 हजार 420 लसींचा पुरवठा होणार आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply