Take a fresh look at your lifestyle.

‘त्याला’ही मोदीजी नाही तर कॉंग्रेसच जबाबदार; भाजपने झटकली जबाबदारी..!

दिल्ली : याआधीच्या काँग्रेस सरकारांच्या धोरणांमुळेच आज देशात इंधनाच्या किमती वाढत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला. ‘आज इंधनाच्या दरात जी वाढ होत आहे त्यास आमचे सरकार जबाबदार नाही तर आधीचे काँग्रेस सरकार जबाबदार आहे. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने इंधनाच्या किमती आंतरराष्ट्रीय किंमत निर्देशांका बरोबर जोडल्या होत्या. त्यामुळे आता या किमती कोणत्याही सरकारच्या नियंत्रणात राहिलेल्या नाहीत. काँग्रेस सरकारने जे धोरण बनवले होते त्यामुळेच आज इंधनाचे दर वाढत आहेत’ असे शर्मा यांनी स्पष्ट केले.

Advertisement

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर काही केल्या कमी होण्यास तयार नाही. इंधन दरवाढीचा लोकांनी सुद्धा चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी करण्याची मागणी होत आहे. मात्र, पेट्रोलियम कंपन्या कोणताही दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाहीत. केंद्र सरकारने सुद्धा याबाबत काहीच विचार केलेला नाही. उलट सरकारचे मंत्रीच विरोधी पक्षांवर आरोप करत जबाबदारी ढकलण्याचे काम करत आहेत.

Advertisement

Advertisement

आताही भाजप खासदार आणि पूर्व मंत्री महेश शर्मा यांनी इंधनाच्या दरवाढीसाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. पेट्रोल-डिझेलच्या माध्यमातून केंद्र सरकारने करोडो रुपये वसूल केल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना शर्मा यांनी इंधन दरवाढीसाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे ‘इंधनाचे दर कसे नियंत्रणात आणता येतील यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटी अंतर्गत आणता येईल का, याचा विचार सरकार करत आहे. देशातील महागाई कमी करण्यासाठी सुद्धा सरकारने प्रयत्न केले आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे काम उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने केले आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, सातत्याने वाढत जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरून विरोधक केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. काँग्रेसने तर अनेक वेळा आंदोलने केली आहेत. काँग्रेसचे नेते सुद्धा सरकारवर टीका करत असतात. इंधनाच्या दरात कपात करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणीही होत असते. असे असले तरी केंद्र सरकारने मात्र यावर अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे देशात रोजच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply