Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ मुद्द्यावर झालीय राष्ट्रवादी आक्रमक; राज्यभरात उडणार आंदोलनाचा बार..!

मुंबई : देशात सातत्याने वाढत जाणाऱ्या महागाईच्या विरोधात काँग्रेसने आंदोलने केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला आहे. घरगुती गॅस, इंधन दरवाढ आणि एकूणच वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस उद्या आणि परवा राज्यभरात आंदोलन करणार आहे. सध्या कोरोनाचे संकट आहे, त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन आंदोलन करण्याचे आवाहन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या कारभारावर पाटील यांनी जोरदार टीका केली. केंद्र सरकारमुळे देशात महागाई वाढली आहे. इंधनाचे दर तर कमालीचे वाढले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. केंद्र सरकारच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

Advertisement

देशात कोरोना संकटाच्या पाठोपाठ महागाईचे संकट आले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर तर रोजच वाढत चालले आहेत. या दरवाढीमुळे देशांतर्गत महागाईत सुद्धा वाढ झाली आहे. खाद्यतेलांचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यानंतर नागरिकांना आणखी झटका बसला आहे. 1 जुलैपासून घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे दर 25.5 रुपये वाढ करण्यात आली आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने गॅस टाकीचे दर वाढणार असल्याचा अंदाज होताच. त्यानुसार तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली. या दरवाढीमुळे आधीच वाढत असलेल्या महागाईत आणखी वाढ झाली आहे.

Advertisement

या दरवाढीचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. विरोधक सुद्धा केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने देशभरात आंदोलन केले होते. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. महागाई कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राज्यात दोन दिवस आंदोलन पुकारण्यात आले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply