Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारकृपेने महागाईचा राक्षस जोमात; पहा कशामुळे जनता गेलीय कोमात..!

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना महागाईच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. इंधन आणि खाद्यतेलांच्या किमती बऱ्याच दिवसांपासून वाढत आहेत. त्यानंतर आता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच आणखी काही दरवाढीचे निर्णय घेतले गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट मात्र पूर्ण कोलमडले आहे. नवे नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर त्याचा ताण पडत आहे.

Advertisement

तेल कंपन्यांनी देशातील ग्राहकांना जोरदार झटका देत घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. इंधनाच्या किमती वाढत असल्याने गॅस टाकीच्या किंमती वाढण्याचा अंदाज होताच. आणि घडलेही तसेच. 14.2 किलोच्या घरगुती गॅस टाकीच्या दरात 25.50 रुपये तर 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात 76 रुपये वाढ करण्यात आली आहे. देशातील तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीस एलपीजी गॅस सिलिंडर किमतींचा आढावा घेतात. नवे दर 1 जुलैपासून लागू करण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement

बेसिक सेविंग बँक डिपॉझिट खातेधारकांसाठी एसबीआय एका आर्थिक वर्षात दहा चेक मोफत देईल. त्यांनतर मात्र दहा चेक असणाऱ्या चेकबुकसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी चेकबुकवर नवीन शुल्कात सवलत मिळणार आहे. एसबीआयने 1 जुलैपासून नवीन सर्व्हिस चार्ज लागू केले आहेत. बँकेच्या बेसिक सेविंग डिपॉझिट खातेधारकांना बँकेच्या शाखेतून किंवा एटीमद्वारे आता फक्त चार वेळेस कोणत्याही शुल्काविना पैसे काढता येणार आहेत. चार वेळेपेक्षा जास्त वेळेस पैसे काढले तर बँक त्यावर चार्जेस घेणार आहे. चारपेक्षा जास्त वेळेस पैसे काढले असतील तर चार पुढील व्यवहारांसाठी बँक शुल्क आकारणार आहे.

Advertisement

देशातील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकीने चारचाकी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त हिरो मोटोकॉर्प कंपनीने सुद्धा बाईक्स आणि स्कुटरच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 1 जुलैपासून दुचाकी वाहनांच्या किमतीत साधारण 3 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याचा अंदाज आहे. 1 जुलैपासून आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांना 20 पानी चेकबुक मोफत मिळणार आहे. यानंतर प्रत्येक चेकसाठी 5 रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत. याआधी बँकेत खाते उघडल्यानंतर पहिल्या वर्षात 60 पानांचे चेकबुक मोफत दिले जात होते.

Advertisement

गुजरात सहकारी दूध विपणन संघाने अमूल दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपये वाढ केली आहे. त्यामुळे अमूलचे दुधासाठी जास्त पैसे द्यावे लागत आहे. कंपनीने दीड वर्षांनंतर दूध दरवाढ केली आहे. नव्या दरानुसार आता एक लिटर अमूल गोल्ड दूध 58 रुपयांना मिळेल. विमान प्रवास करणाऱ्यांसाठी टेन्शनमध्ये वाढ करणारी बातमी आहे. विमान कंपन्या पुन्हा तिकीट दरात वाढ करण्याच्या तयारीत आहे. कारण, विमानात वापरण्यात येणाऱ्या इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीत एअर टर्बाइन फ्यूलच्या किमतीत वाढ होऊन या इंधनाचे दर 68,262 रुपये प्रति किलोलीटर पर्यंत पोहोचले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply