Take a fresh look at your lifestyle.

फिकर नॉट.. मोबाईल पावसात भिजून खराब होण्याची भीती असेल तर वाचा की ‘ही’ माहिती

आता पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. पाऊस कधी आणि केव्हा होईल, याचा काही नेम नाही. पाऊस होणार नाही, असा विचार करून घराबाहेर पडले की हमखास पाऊस येतोच. मग काय पावसात भिजू नये यासाठी धावपळ होते. या धावपळीत बऱ्याच वेळा आपल्याकडील महत्वाच्या वस्तू पावसात भिजल्याने खराब होतात. पावसात मोबाइलमध्ये पाणी गेल्याने मोबाइल खराब होण्याची समस्या कायमच असते. मोबाइल खराब झाला तर अनेक वेळा नुकसान सहन करावे लागते. अँड्रॉइड स्मार्टफोन असेल तर सगळेच काम अडकून पडते. अशा वेळी पावसामुळे मोबाइल ओला होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी काही सोपे उपाय आहेत, जेणेकरून मोबाइल पावसापासून सुरक्षित राहील…

Advertisement

Advertisement

स्मार्टफोनच्या आकाराचे झिप पाऊच बाजारात मिळतात. या पाऊचमध्ये फोन ठेवला तर ओला होण्याची भीती राहत नाही. पावसाच्या दिवसात मोबाइलसाठी हे पाऊच उपयुक्त आहे. अँड्रॉइड स्मार्टफोनची किंमत जास्त असते. तसेच बहुतेक महत्वाची कामे आता या मोबाइलद्वारेच होतात. अशा वेळी जर मोबाइल खराब झाला किंवा पाणी गेले तर सारे कामच अडकते. अनेक वेळा नुकसान सुद्धा सहन करावे लागते. त्यामुळे पावसात मोबाइल ओला होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे ठरते. यासाठी तुम्ही मोबाइल वॉटर प्रूफ फ्लिप कव्हर वापरू शकता. यामुळे फोन पावसात भिजण्याचा प्रश्न राहणार नाही तसेच मोबाइल फुटण्याचा धोका सुद्धा राहणार नाही. आज बरेच लोक मोबाइल फोन वापरतात. मात्र, नुसत्या मोबाइल कव्हरपेक्षा वॉटर प्रूफ कव्हर वापरणे फायद्याचे आहे.

Advertisement

स्मार्ट फोन ओला होणार नाही यासाठी बाजारात मोबाइल वॉटर प्रूफ बॅगसुद्धा मिळतात. त्याचाही वापर आपण करू शकता. स्मार्ट फोन पावसात खराब होणार नाही यासाठी आणखी एक उपाय म्हणजे आपण वॉटर प्रूफ ब्लूटूथ इअरबडस वापरू शकता. या ब्लूटूथ बरोबर मोबाइल कनेक्ट केल्यानंतर मोबाइल बॅगमध्ये ठेऊन दिला तरी चालेल. त्यामुळे फोन पावसात भिजण्याचे टेन्शन आजिबात राहणार नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.