Take a fresh look at your lifestyle.

‘त्यावेळी’च होणार विधानसभा अध्यक्षांची निवड; मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेय प्रत्युत्तर

मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रावरुन राज्यात चांगलाच गदारोळ उडाला होता. सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्रास सविस्तर उत्तर दिले आहे.

Advertisement

राज्यपालांनी पत्राद्वारे जे मुद्दे उपस्थित केले होते. त्या सर्वांचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, विधानसभा अध्यक्ष पदासाठी तत्काळ निवडणूक घेण्यात यावी तसेच ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित कराव्यात, अशी मागणी भाजप नेत्यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर या मागण्या महत्वाच्या असल्याने यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केल्या होत्या.

Advertisement

Advertisement

त्यानंतर आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी या पत्रास उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे, की अधिवेशनाचा कालावधी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरवण्यात आला आहे. यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली आहे. कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका आणि केंद्र सरकारने दिलेल्या सूचना विचारात घेऊन हा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाच्या निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे, असे त्यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी कोणताही कालावधी निश्चित केलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांची निवड करता आलेली नाही. अध्यक्ष पदाची निवडणूक लवकरात लवकर घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी पत्र पाठवल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली होती. राज्यपाल यांचे कार्यालय म्हणजे भाजप कार्यालय झाले आहे. राज्यपालांच्या सांगण्यावरुन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याते येत आहे, हे सांगण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. राज्यपाल भाजप आणि संंघाच्या कार्यकर्त्यासारखे वागत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेच्या १२ रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित करत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडी बहुमताने जिंकेल, असा दावा केला होता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply