Take a fresh look at your lifestyle.

कृषी कायद्यांवर मोदी सरकारचे आहे ‘हे’ धोरण; पहा काय म्हटलेय मंत्री तोमर यांनी

दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत सात महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. तरी देखील केंद्र सरकारने अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिल्यानंतर आता पुन्हा केंद्र सरकारने चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

Advertisement

त्यांनी पुन्हा स्पष्ट शब्दात सांगितले आहे, की ‘कृषी कायदे मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणत्याही परिस्थितीत कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत. उलट हे कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी परिवर्तन येणार आहे,’ असा दावा त्यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले, की ‘देशातील बहुतांश शेतकरी या कायद्यांचे समर्थन करत आहेत. तरी सुद्धा विरोध करणाऱ्या शेतकरी संघटना बरोबर चर्चा करण्याचा पूर्ण प्रयत्न सरकारने केला आहे. कृषी कायदे मागे घेण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मुद्यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. आतापर्यंत 11 वेळेस बैठका झाल्या आहेत. तरी सुद्धा कृषी कायदे काय आहेत हे आंदोलकांच्या लक्षात येत नाही. यामध्ये सरकारचा काहीच दोष नाही,’ असे कृषिमंत्री तोमर यांनी स्पष्ट केले.

Advertisement

दरम्यान, केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करत विविध शेतकरी संघटनांनी राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकारने हे कायदे तत्काळ रद्द करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मात्र, केंद्र सरकार सुद्धा कोणत्याही परिस्थितीत कायदे मागे घेण्याच्या विचारात नाही. या व्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. याआधी सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली आहे, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार सुद्धा कायदे मागे घेण्यास तयार नाही, त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन सुरूच आहे. आताही कृषिमंत्री तोमर यांनी कृषी कायदे मागे घेण्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले होते.

Advertisement

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply