Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षणासाठी ‘ते’ करण्याचा फडणवीसांनी दिलाय सल्ला..!

नाशिक : सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने दिलेले आरक्षण टिकलेले नाही. आता याचा चेंडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोर्टात आहे. अशावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे.

Advertisement
Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ओबीसी आरक्षणासाठी एम्पिरिकल डेटाचे काम मागासवर्ग आयोगाला देणे योग्यच! मराठा आरक्षणासाठी सुद्धा राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून तातडीने पाऊले उचलावीत! कालही त्यांनी म्हटले होते की, फेरविचार याचिकेला मर्यादा असतात, हे न्या. भोसले समितीने आधीच त्यांच्या अहवालात नमूद केले होते. त्यामुळे न्या. भोसले समितीच्या शिफारसी राज्य सरकारने तत्काळ अंमलात आणाव्यात, अशी आमची मागणी आहे.

Advertisement

दरम्यान, ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थेत घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने मराठा आणि ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना ५०% शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या या निर्णयामुळे मराठा व ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisement
Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.