Take a fresh look at your lifestyle.

‘अरे.. कुठेय लसटंचाई..? लसच लस आहेत की सगळीकडे..!’; मोदी सरकारने मांडले ‘असे’ गणित..!

दिल्ली : देशात आता 21 जूनपासून सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणास सुरुवात झाली आहे. यासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देत आहे. राज्यांनी लसीकरण सुरू केले असले तरी पुन्हा लसींच्या कमतरतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंजाब आणि छत्तीसगड राज्यांनी याबाबत केंद्र सरकारला माहिती देत पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे की राज्यात लसींची केमतरता असल्याचे केंद्र सरकार आजही मान्य करण्यास तयार नाही.

Advertisement

Advertisement

कोरोना काळात लसींच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेला वाद अजूनही मिटलेला नाही. लसी वेळेवर मिळत नसल्याची तक्रार राज्ये करत असली तरी केंद्र सरकार मात्र आपल्या दाव्यावर ठाम आहे. आताही केंद्र सरकारने राज्यांकडे जवळपास 1.24 कोटींपेक्षा जास्त लसी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना प्रतिबंधक लसींबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 32.92 कोटी लसी दिल्या आहेत. यामध्ये वाया गेलेल्या लसींचाही समावेश आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे आजही लसीकरणासाठी 1.24 कोटीपेक्षा जास्त लसींचे डोस शिल्लक आहेत. तसेच पुढील तीन दिवसात राज्यांना 94 लाख 66 हजार 420 लसींचा पुरवठा होणार आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

Advertisement

दरम्यान, देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात तिसरी लाट आली तरी आता या लाटेचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. तिसरी लाट आलीच तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नियोजन करण्यास सुरुवात केली. देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले. नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतील याचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यास तयार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply