Take a fresh look at your lifestyle.

‘मग तिसरी लाट येण्याचा प्रश्नच नाही..!’; पहा नेमके काय करावे लागणार आहे ‘त्यासाठी’

दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर आता तिसऱ्या लाटेच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तिसरी लाट येणार असल्याचा इशारा दिला गेला असला तरी लाट केव्हा येणार यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. राज्यांनी मात्र भविष्यातील धोका पाहता नियोजनास सुरुवात केली आहे. तिसरी लाट आलीच तर या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी काय आवश्यक आहे, याचा विचार करुन त्यानुसार नियोजन सुरू आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी आधिक जबाबदारीने वर्तणूक करत कोविड प्रोटोकॉलचे पालन केले तर कदाचित तिसरी लाट येणार नाही, असे मत तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत.

Advertisement

Advertisement

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही असेच मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले, की लोकांनी जबाबदारी ओळखून सावध राहिले आणि देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येचे लसीकरण करण्यात यश मिळाले तर कदाचित देशात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही. आणि आली तरी या लाटेचा फारसा प्रादुर्भाव राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
एएनआय वृत्तसंस्थेस माहिती देताना ते म्हणाले, की तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखणे हे लोकांच्या हातात आहे. आता सर्व काही आपणावर अवलंबून राहणार आहे. आपण जर सतर्क राहिलो आणि लसीकरण चांगल्या पद्धतीने झाले तर कदाचित तिसरी लाट येणारही नाही.

Advertisement

दरम्यान, देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात तिसरी लाट आली तरी आता या लाटेचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.  तिसरी लाट आलीच तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नियोजन करण्यास सुरुवात केली. देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले. नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतील याचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यास तयार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.