Take a fresh look at your lifestyle.

आलीय भन्नाट संधी..! पेटीमने आणलीय भन्नाट स्कीम; वाटणार तब्बल ५० कोटींचा कॅशबॅंक..!

पुणे : डिजिटल पेमेंट्स कंपनी पेटीएमने नवीन ऑफर खुली केली आहे. ही कंपनी ग्राहक आणि व्यापारी यांच्यासाठी कॅशबॅक योजना (Paytm Cashback) सुरू करणार असून त्यासाठी तब्बल ५० कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.

Advertisement

कंपनी लवकरच आयपीओ (IPO one97 communication) घेऊन येत आहे. पेटीएमने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या ऑफरचा एक भाग म्हणून, पेटीएम अ‍ॅपद्वारे केलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी व्यापारी आणि ग्राहकांना कॅशबॅक मिळेल. डिजिटल इंडिया घोषणेस सहा वर्षे होत असल्याच्या (investors 6 years of digital india) निमित्ताने कंपनीने ही खास स्कीम जाहीर केली आहे.

Advertisement

पेटीएमने सुरू केलेला हा कार्यक्रम कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणासह इतर राज्यातील जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेद्वारे देशभरातील 200 जिल्ह्यांमध्ये स्कीम लागू होत आहे. हे 200 जिल्हे कोणते असतील, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. म्हणून जर आपण पेटीएम वापरत असाल तर पेटीएमची ही घोषणा आपल्यासाठी कोणत्याही चांगल्या बातमीपेक्षा नक्कीच कमी नाही की.

Advertisement

बर्नस्टेनचे गौतम चुगानी यांच्या म्हणण्यानुसार पेटीएमच्या सेवांचा विस्तार होत आहे. त्यामुळे कंपनी लवकरच तोट्यातून मुक्त होईल अशी अपेक्षा आहे. पेटीएम हळूहळू देय सेवांवरील आपले अवलंबन कमी करीत आहे. ती क्रेडिट टेक (credit card loan), विमा (insurance) आणि वेल्थ टेककडून आपले उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.