Take a fresh look at your lifestyle.

लस न घेतल्यास पगारवाढीला ब्रेक..! कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी कंपन्यांचा निर्णय, लसीसाठी कर्मचाऱ्यांची धावाधाव..

मुंबई : कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आल्याने अनेक कंपन्या बराच काळ बंद राहिल्या. त्यात मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र, आता काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय सुरळीत होत आहेत. सरकारने मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली आहे.  लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी कंपन्यांनीही पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.

Advertisement

कर्मचार्‍यांनी लवकरात लवकर लसीकरण करण्याबाबत कंपन्यांनी सूचना दिल्या आहेत, जेणेकरून हे कर्मचारी आपल्या कार्यालयात येऊन काम सुरु करु शकतील.

Advertisement

दरम्यान, देशातील सर्वात जुनी खेतान अँड कंपनीने वेगळीच घोषणा केली आहे. ती म्हणजे, लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्याला पगारवाढ दिली जाणार नसल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. जास्तीत जास्त कर्मचार्‍यांनी वेळेवर लस घ्यावी, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली आहे, तर काही कंपन्या लस न घेतलेल्या कर्मचार्‍यांचे पगार कापत आहेत. एका वित्तीय सेवा कंपनीने कर्मचाऱ्यांनी लस न घेतल्यास पगारात 5 टक्के कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अर्थात, लस घेतल्यावर त्यांचे वजा केलेले पैसे परत दिले जाणार आहेत.

Advertisement

कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याने शक्य तितक्या लवकर लसीकरण करुन घ्यावे, जेणेकरुन ऑफिस सुरू झाल्यावर कोणताही धोका उद्भवू नये, तसेच कोरोनाच्या भीतीपोटी पुन्हा एकदा ऑफिस बंद ठेवण्याची वेळ येऊ नये, यासाठी कंपन्यांनी असे कठोर निर्णय घेतल्याते सांगण्यात आले.

Advertisement

कोरोनापासून बचावासाठी सध्या तरी लस हा एकमेव आधार आहे. त्यामुळे कंपन्यांचे कामकाज लवकर सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर कंपन्या जोर देत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply