Take a fresh look at your lifestyle.

‘त्यात भाजप सरकार ठरलेय सपशेल अपयशी’; पहा कोणत्या मुद्द्यावर पक्षावर झालीय दणकेबाज टीका..!

लखनऊ : उत्तर प्रदेश राज्याच्या निवडणुका पुढील वर्षात होणार आहेत. मात्र, राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पार्टीने सत्ताधारी भाजपवर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणासह अन्य मुद्यांवर राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारवर टीकेचा भडिमार केला आहे.

Advertisement

Advertisement

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, की ‘आज राज्यात लोकांना लसींची आवश्यकता आहे मात्र सरकार लोकांचे लसीकरण करण्यात अपयशी ठरत आहे. लसींचे नियोजन पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे तरीसुद्धा रोजगार, कोविड 19, अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आढावा का घेतला जात नाही, गुंतवणुकीबाबत जी आश्वासने दिली होती, त्याचे काय? गंगा नदीच्या साफसफाईचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले,’ असे सवाल यादव यांनी यावेळी उपस्थित केले.
‘राज्यातील जनता अजूनही स्वस्त दरात वीज पुरवठा केव्हा होईल, याची वाट पाहत आहे. या सरकारने राज्यातील दवाखान्याची अवस्था अतिशय खराब करून टाकली आहे,’ असा आरोप त्यांनी केला.

Advertisement

दरम्यान, याआधी यादव यांनी स्विस बँकेतील जमा पैशांच्या मुद्द्यावर सरकारवर गंभीर आरोप केले होते. भाजप सरकारच्या शासन काळात झालेल्या घोटाळ्यांमुळे विदेशात जमा असल्येल्या काळ्या पैशात वाढ झाली आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला होता. भाजप सरकारमध्ये विकासाची कामे नाहीतच. या सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांमुळेच विदेशात जमा असलेल्या काळ्या पैशात वाढ झाली, आणि देशाचा जीडीपी मात्र घटत गेला. जनतेचा विश्वास गमावलेल्या भाजपने आता घोटाळ्यांद्वारे कमाई करण्याचा नवा मार्ग शोधला आहे.
कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार सहन करणार नाही, असा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा सुध्दा पोकळ असल्याचे सिद्ध झाले आहे. राज्य सरकारच्या अनेक योजनांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यादव यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

Advertisement

भाजप सरकारच्या काळात नागरिक त्रस्त आहेत आणि कायदा सुव्यवस्था ध्वस्त आहे. त्यामुळे भाजप नेतृत्वासही आता असे वाटत आहे, की आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होणार आहे, आणि समाजवादी पार्टीचे सरकार राज्यात येणार आहे, असा दावा त्यांनी केला होता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply