Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. किती ही महागाई..! म्हणून नटायच्या खर्चातही तब्बल ४० टक्के वाढ..!

पुणे : पेट्रोल-डीझेल यांच्या दरवाढीचा फटका इतर क्षेत्राला आपोआपच सहन करावा लागतो. यातील कच्च्या मालासह एकूण वाहतूक खर्चात वाढ झाल्याचा फटका सहाम करावा लागतो. तसाच झटका आता केंद्र सरकारच्या कृपेने एकूण किराणा मालाच्या यादीसह सौंदर्य प्रसाधनांच्या बाबतीत बसला आहे.

Advertisement

साबण, तेल आणि शॅम्पूसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू महागाईच्या आगीत भडकल्या असून तीन महिन्यांत दैनंदिन वापराच्या सर्वच वस्तूंचे दर ३ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढले. परिणामी सामान्य महिलांच्या खर्चाचे बजेट कोलमडले आहे. जागतिक स्तरावर पाम तेल, कच्चे तेल, सोडा भुकटी, कॉस्टिक सोडा आदी कच्च्या मालातील दरवाढ झाल्याचा फटका डिटर्जेंट, तेल, चहापत्ती, केचप, जाम, नूडल्स यांना बसला आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज यांनी ही माहिती दिली आहे.

Advertisement
दरवाढ झालेल्या वस्तूबाबत महत्वाची माहिती
साबण, शॅम्पूसारख्या उत्पादनांचे दर ४ ते १६ टक्के वाढ
गोडेतेलाचे दर १२ ते ४० टक्के वाढले
चहापत्ती ४ ते ८ % आणि कॉफी २ ते ७ % महाग
एचयूएल, डव्ह, हमाम, लाइफबॉय, लक्स, पियर्स ८-२० % आणि गोदरेज सिंथॉल, गोदरेज नं.१ साबण ६ ते ८ % महाग
एचयूएल व्हील, रिन, सर्फ एक्सल ३-१० %, ज्याेती लॅबचे हेन्काे ३ % अाणाि पी अॅण्ड जी टाइड ४ % महाग
कोलगेट डेंटल क्रीम, हर्बल, मॅक्स फ्रेश, टोल ३ ते ४ टक्के, डाबर रेड, मिस्वाक ३ %, पेप्सोडेंट ४ % महागले
चयूएल डव, क्लिनिक प्लस आणि सनसिल्क ८ ते १६ टक्क्यांपर्यंत महाग
मॅरिको सफोला २० ते ४०%, अॅग्रोटेक फूड सनड्रॉपचे दर १२ ते ३३ टक्के वाढले
चहापत्तीत ताजमहल, रेडलेबल, सोसायटीचे दर ४ ते ८ टक्के, बेबी फूड नेस्ले ३ ते ७ %, केचप, मॅगी, किसान २ ते ८ %, जाममध्ये किसान ५ %, नूडल्समध्ये सनफिस्ट २० % वाढ

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.