Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. आजही दिसला लाल दिवाच; पहा कोणत्या शेअरला बसलाय सर्वाधिक झटका

मुंबई : आठवड्याचा चौथा व्यापार दिवस असतानाही गुरुवारी स्टॉक मार्केट लाल निशाण्यावरच बंद झाले. दिवसभराच्या अस्थिरतेनंतर मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 164.11 अंक (0.31 टक्के) खाली येऊन 52,318.60 वर बंद झाला. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 41.50 अंकांनी म्हणजे 0.26 टक्क्यांनी घसरून 15,680.00 वर बंद झाला.

Advertisement

आज डॉ. रेड्डी, हिंडाल्को, बजाज ऑटो, टाटा मोटर्स आणि सन फार्मा यांचे समभाग ग्रीन मार्कवर (वधारून)  बंद झाले. दुसरीकडे बजाज फिनसर्व्ह, ब्रिटानिया, इन्फोसिस, विप्रो आणि श्री सिमेंट यांचे शेअर्स लाल निशाणावर म्हणजे आपटी खाऊन खाली आले. सेक्टरल इंडेक्स पाहता आज एफएमसीजी, फार्मा, ऑटो आणि पीएसयू बँका ग्रीन झोनमध्ये राहिल्या. तर, दुसरीकडे आयटी, रियल्टी, मीडिया, फायनान्स सर्व्हिसेस, बँक, प्रायव्हेट बँक आणि मेटल सेक्टर लालेलाल होते.

Advertisement

सेन्सेक्सच्या पहिल्या 10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात वाढले होते. गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या पहिल्या दहा कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन (मार्केट कॅप) 1,11,220.5 कोटी रुपयांनी वाढले. या काळात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि इन्फोसिस या कंपन्यांनी सर्वाधिक कमाई केली. टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) बाजारातील भांडवलात वृद्धी नोंदवली. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्रा बँकेचे बाजार मूल्य घटले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply