Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. इंधन दरवाढीमुळे भडकले पेट्रोलियम मंत्री..! पहा नेमका काय इशारा दिलाय त्यांनी..!

दिल्ली : इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे तर दुसरीकडे मात्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली आहे. या त्रासात नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित असताना सत्ताधारी भाजपमधील मंत्री आणि नेते मंडळी अजब वक्तव्ये करत आहेत, ज्यामुळे नागरिकांत असंतोष वाढत चालला आहे. त्याला मोकळी वाट करून द्यायला वेगळेच खेळ मंत्री करीत आहेत.

Advertisement

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत चालले आहेत. कोरोनाच्या संकटात सुद्धा पेट्रोलियम कंपन्या नागरिकांना कोणताही दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाहीत, त्यामुळेच तर मनमानी करत इंधनाची दरवाढ करत आहेत. या दरवाढीमुळे देशातील अनेक शहरांत पेट्रोलने शंभरचा आकडा केव्हाच पार केला आहे, डिझेल सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करत आहे.

Advertisement

Advertisement

असे असले तरी सध्याच्या परिस्थितती इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता दिसत नाही. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जास्त आहेत. या किमती कमी होण्याची गरज आहे, असे भारत सरकारने म्हटले आहे. तेल निर्यातक देशांची संघटनेच्या (ओपेक) बैठक होणार आहे. या बैठकीआधी भारताने कच्च्या तेलाच्या किंमती कमी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, की ज्या ठिकाणी कमी दरात तेल मिळेल तेथून तेल खरेदी करण्याची तयारी आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्याने भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. सध्याच्या परिस्थितीत जागतिक बाजारात क्रूड तेलाच्या किमती 75 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत.

Advertisement

दरम्यान, पेट्रोलियम पदार्थांवर सरकारने अनेक प्रकारचे कर लावले आहेत. या करांच्या माध्यमातून सरकारला भरघोस महसूल मिळत आहे. पैसे कमावण्याचा हा हक्काचा मार्ग असल्याने सरकार कोणत्याही परिस्थितीत टॅक्स कमी करण्याचा विचार करत नाही. आताही कोरोना संकटात लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, महागाई वाढत चालली आहे, कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळत आहे, कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. तरीसुद्धा इंधनाच्या किमती कमी करण्याचा कोणताच विचार सरकारने केलेला नाही. उलट, यंदा तर इंधनावरील करांच्या माध्यमातून सरकारने रेकोर्ड ब्रेक उत्पन्न मिळवले आहे.

Advertisement

यावेळी पहिल्यांदाच सरकारला प्राप्तिकरातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न पेट्रोल आणि डिझेलवरील करांतून मिळाले आहे. मागील आर्थिक वर्षात पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीतून तब्बल 5.25 लाख कोटी रुपये सरकारने कमावले आहेत. याच वेळी प्राप्तिकरातून मात्र सरकारला 4.69 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच कंपन्यांच्या कॉर्पोरेट करातून 4.57 लाख कोटी रुपये मिळाले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply