Take a fresh look at your lifestyle.

आता ‘या’ विमा कंपनीचे खासगीकरण होणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय, पाॅलिसीधारकांचे काय होणार..?

नवी दिल्ली : मोदी सरकारने अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका, तसेच एक सामान्य विमा कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार एलआयसीचे खासगीकरण केले जाणार असल्याची जोरदार चर्चा होती, परंतु सरकारने एलआयसीचा आयपीओ आणण्याची तयारी केल्याची चर्चा आहे.

Advertisement

मोदी सरकार एलआयसी नव्हे, तर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे खासगीकरण करणार असल्याचे समोर आले आहे. ही सरकारी कंपनी आता खासगी हातात देण्याची शिफारस नीती आयोगाने केली आहे. त्यास अर्थ मंत्रालयानेही सहमती दर्शविली आहे.

Advertisement

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी एक अनलिस्टेड सरकारी कंपनी आहे. आता ही लिस्टेड कंपनी केली जाईल, परदेशी कंपनीला दिली जाईल, की देशातील एखादी कंपनी तिची जबाबदारी स्वीकारेल, हे अद्याप ठरलेले नाही.

Advertisement

पहिल्या टप्प्यात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे खासगीकरण होऊ शकते. ‘सीएनबीसी आवाज’च्या वृत्तानुसार खासगीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. वित्त मंत्रालय आणि नीती आयोगात या कंपनीच्या खासगीकरणावर सहमती झाली आहे.

Advertisement

नीती आयोगाचे उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील समितीने युनायटेड इंडिया कंपनीच्या खासगीकरणाची शिफारस केली आहे. नीती आयोगाने विमा क्षेत्रातील अनेक कंपन्यांचा आढावा घेतला. त्यात असे आढळले, की खासगीकरण झाल्यास ही कंपनी भविष्यात अधिक चांगल्या स्थितीत येईल.

Advertisement

‘एफडीआय’मध्ये विमा क्षेत्रात बदल करण्यात आले आहेत. परंतु त्यानंतरही सरकारने अनेक कठोर तरतुदी ठेवल्या आहेत. अशा परिस्थितीत एखादी देशी कंपनी युनायटेड इंडिया हातात घेते की परदेशी कंपनी, याची उत्सुकता आहे. पूर्वी अनलिस्टेड कंपनी लिस्टेड केल्यावरच तिचे खासगीकरण केले जात असे; पण  आता तशी सक्ती नाही.

Advertisement

कंपनीच्या दाव्यानुसार, त्यांचे पावणे दोन कोटी पॉलिसीधारक आहेत. लहान, मध्यम शहरांत पॉलिसी खरेदीदारांसाठी कार्यालये उघडली आहेत. युनायटेड इंडियामध्ये जवळपास 2500 मोठी कार्यालये आहेत. कंपनीचे खासगीकरण केले, तरी भविष्यात कंपनी वा पॉलिसीधारकांना कोणतीही अडचण येणार नाही.

Advertisement

खासगीकरणाचे काम गुंतागुंतीचे आहे. या कामासाठी सरकारने कायद्यात पूर्वीच बदल केले आहेत. विमादुरुस्ती कायदाही आणला. आता संपूर्ण जबाबदारी आंतर-मंत्री गट अर्थात ‘आयएमजी’वर अवलंबून आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply