Take a fresh look at your lifestyle.

आहात ना तयार..? SBI चा पुन्हा एकदा झटका; पहा कोणत्या नियमाचा बसणार ग्राहकांना फटका..!

नाशिक : बँक म्हणजे ग्राहकांना सेवा कमी आणि डेबिट टाकणारे यंत्र अशीच परिस्थिती भारतात झाली आहे. सामान्य ग्राहकांना सर्व बाजूने सेवाशुल्क आकारणी करून अडचणीत आणण्यात बँकांचा हातखंडा आहे. रिझर्व बँक आणि केंद्र सरकारचा वित्त विभागही याकडे लक्ष देत नसल्याने बँकाचे फावले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी ग्राहकांना दणका देणारी नवी ‘स्कीम’ आणली आहे.

Advertisement

Advertisement

बँकिंगच्या अनेक नियमांमध्ये १ जुलैपासून अनेक बदल होत असून देशात सर्वाधिक खातेदार असलेल्या भारतीय स्टेट बँकेने महिन्यात चारपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास शुल्क वसूल करण्याचा पठाणी संकेत जारी केला आहे. आता नव्या नियामनुसार स्टेट बँकेची शाखा असो की एटीएम आता महिन्यात फक्त चार वेळाच रोकड काढता येणार आहे. त्यानंतरच्या सर्वच विनिमयास मग प्रत्येकवेळी १५ रुपये आणि जीएसटी शुल्क बँक ग्राहकांच्या खात्यातून वसूल केले जातील.

Advertisement

यासह १० पानांचे मोफत भेटणारे चेकबुक आता मोफत भेटणार नसून त्यासाठी थेट ४० रुपये शुल्क आणि जीएसटी वसूल केला जाईल. तत्काळ चेकबुक घेतले तर ५० रुपये घेण्यासह  चेकबुकद्वारे होम ब्रँचमधूनच पैसे काढले तर शुल्कातून सूट दिली जाईल. बँकेने हा नियम लागू करताना चक्क ‘नैतिकता’ दाखवत ज्येष्ठ नागरिकांसाठी हा नियम लागू न करतानाच त्यांना आधी सारखेच चेकबुक मोफत घेण्याची सोय ठेवली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply