Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ पत्रावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादी झालेत आक्रमक; पहा नेमके काय मुद्दे आहेत त्यात

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी म्हंटले आहे, की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन दिले. यामध्ये त्यांनी विधानसभा आधिवेशनाचा कालावधी वाढ करणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा, अशा मागण्या केल्या आहेत. हे मुद्दे महत्वाचे आहेत, त्यामुळे यावर योग्य कार्यवाही करावी असे राज्यपालांनी या पत्रात म्हटले आहे.

Advertisement

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पाठवलेल्या एका पत्रावरुन राज्याच्या राजकारणात वाद सुरू झाला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी राज्यपालावर जोरदार टीका केली आहे. सध्या राज्याच्या राजकारणात या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांवर टीका केली आहे. आमदारांचे कोरोना तपासणी अहवाल मिळाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. मात्र, आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मतांनी जिंकू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

Advertisement

राज्यात विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीतील तिनही पक्षांचे याबाबत एकमत आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकर घेण्याबाबत सांगितले आहे. दुसरीकडे मात्र विधानपरिषदेच्या 12 जागा बऱ्याच दिवसांपासून रिक्त आहेत, याची आठवण करून देत हा मुद्दा राज्यपालांनी लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली.
या पत्रावरून काँग्रेसने सुद्धा राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यपाल यांचे कार्यालय हे भाजप कार्यालय झाले आहे. राज्यपालांच्या सांगण्यावरून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येत आहे हे सांगण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. राज्यपाल भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यासारखे वागत आहेत. राज्यपालांचे काम काय आहे, हे मला सांगण्याची गरज नाही, असेही पटोले यांनी सांगितले.

Advertisement
  • Advertisement

    कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply