Take a fresh look at your lifestyle.

डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा; पहा नेमके काय आहेत निर्देश

मुंबई : देशात सध्या कोरोना आटोक्यात येत असताना कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लसमुळे पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्याने केंद्र सरकारने राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानेसुद्धा राज्यांना पत्र पाठवून ५ महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Advertisement

गृह मंत्रालयाने राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की राज्यांनी पॉझिटिव्ह कोरोना प्रकरणांवर आधिक लक्ष ठेवावे. राज्यांत अनलॉक करताना सुद्धा विशेष खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व राज्यांनी तपासणी, निगरानी, उपचार, लसीकरण आणि उपयुक्त व्यवहा या पाच गोष्टीस प्राधान्य द्यावे, अशा सूचना गृह मंत्रालयाने दिल्या आहेत. देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात तिसरी लाट आली तरी आता या लाटेचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement

तिसरी लाट आलीच तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नियोजन करण्यास सुरुवात केली. देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले. नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतील याचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यास तयार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement

दरम्यान, गृह मंत्रालयाने याआधी सुद्धा राज्यांना पत्र पाठवले होते. देशात अनलॉक होत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दैनंदिन व्यवहार सुरू होत आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरळीत होत आहे. नागरिकांची गर्दी वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे कोरोनाचे संक्रमण फैलावण्याचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाला निमंत्रण देऊन असा कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नये, अशी सक्त ताकीद या पत्रात दिली होती.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply