Take a fresh look at your lifestyle.

फिकर नॉट; ‘त्या’ कंपनीची लस घेतली की मिळणार जीवनभराची करोनासुरक्षा..!

मुंबई : करोना लस घेतली तरी मास्क आणि इतर काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. कारण, भारतातील दोन्ही लस अजूनही १०० टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे दोन्ही डोस घेऊनही करोना होऊ न देण्याची काळजी घ्यावी लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकन कंपनीच्या दोन्ही लस घेतल्या तर जीवनभराची करोनासुरक्षा मिळत असल्याचे संशोधन पुढे आलेले आहे. मात्र, या लस अजूनही भारतात उपलब्ध नाहीत.

Advertisement

Advertisement

कोरोना साथीच्या आजारात रोज बदलत जाणाऱ्या व्हेरीयंटमुले धोक्यात आणखी भर पडते. मात्र, फायझर आणि मॉडर्नाच्या लसबद्दल चांगली बातमी आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे की, फायझर आणि मॉडर्ना यांच्या एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित कोरोना लस या विषाणूंविरूद्ध आजीवन संरक्षण प्रदान करू शकते. या दरम्यान, असेही समोर आले आहे की या दोन लसींच्या दोन डोसांमुळे विषाणूंविरूद्ध तीव्र आणि ‘चिकाटीची’ प्रतिकारशक्ती मिळते. मात्र, संशोधनात अद्याप डेल्टा व्हेरियंट विरूद्ध चाचणी केली गेली नाही. त्यावरील संशोधन निष्कर्ष सकारात्मक आल्यास मग त्याची अधिकृतरीत्या घोषणा केली जाऊ शकते.

Advertisement

या व्यतिरिक्त संशोधनादरम्यान, कोरोना विषाणूच्या दोन व्हेरीयंटविरूद्ध लढण्याची शक्तीही मिळत असल्याचे म्हटले आहे. ज्यांना फाइझर आणि मॉडर्नाकडून कोरोनाची लस मिळते त्यांना बर्‍याच वर्षांपर्यंत किंवा अगदी आयुष्यभर रोग प्रतिकारशक्ती मिळू शकते. इतकेच नाही तर ज्या लोकांना ही लस देतात त्यांना बूस्टर डोसचीही गरज भासणार नाही.

Advertisement

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ डॉ. अली इलेबेडी हे याबाबत म्हणाले की, ‘या लसीपासून जास्त दिवस प्रतिकारशक्ती मिळते याविषयीचे हे एक चांगले चिन्ह आहे. हे संशोधन नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. लास घेतल्यावर चार महिन्यांनंतरही चांगला प्रतिसाद मिळाला. ब्रिटेन आणि दक्षिण आफ्रिकेत आढळणार्‍या कोरोना प्रकारांविरुद्ध फायझर आणि मोडर्नाकडून दिलेली लस फार प्रभावी असल्याचे आढळले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply