Take a fresh look at your lifestyle.

ट्विटरला उपरती..! भारताचा चुकीचा नकाशा हटविला, पण मोदी सरकार करणार अशी कारवाई, जाणून घेण्यासाठी वाचा..!

मुंबई : केंद्र सरकार व ट्विटर यांच्यात सुरू असलेले शीतयुद्ध काही केल्या क्षमताना दिसत नाही. यापूर्वी ट्विटरने उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅंडलवरील ब्लू टिक हटविल्याने मोठा वाद झाला होता. त्यानंतर केंद्रिय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचे अकाउंटच ब्लॉक केलं. त्यानंतर तर ट्विटरने हद्दच केली.

Advertisement

आपल्या नकाशात ट्विटरने चक्क जम्मू-काश्मीर आणि लेहला चीनचा भाग म्हणून दाखविले. त्यामुळे संतापलेल्या केंद्र सरकारने ट्विटरला थेट इशाराच दिला. ही बाब देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेशी निगडित असून, याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सरकारने म्हटले होते. त्यानंतर ट्विटरला उपरती झाली.

Advertisement

आता ट्विटरने आपल्या वेबसाईटवरून जम्मू-काश्मीर आणि लडाख वेगळा दाखविलेला भारताचा चुकीचा नकाशा हटविला आहे.  ‘Tweep Life’वर दाखविलेल्या नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाखला भारतापासून वेगळ दाखवल्यानंतर ट्विटरविरूद्ध सक्त कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

Advertisement

दरम्यान, भारताचा चुकीचा नकाशा दाखविण्याची ट्विटरची काही ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी लेह हा चीनचा भाग असल्याचे दाखविले होते. आता ट्विटरने चुकीचा नकाशा हटविल्याचे कळते आहे.

Advertisement

ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात वाद सुरू असताना, हे प्रकरण समोर आलं. केंद्र सरकार लवकरच ट्विटरला यासंदर्भात नोटीस पाठवणार असल्याचे समजले.

Advertisement

भारताचा नकाशा चुकीचा दाखविल्याबद्दल ट्विटरवर सक्त कारवाई होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्विटरवर मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाऊ शकतो. शिवाय संबंधित अधिकाऱ्यांना सात वर्षांचा तुरुंगवासही ठोठावला जाण्याची शक्यता आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply