Take a fresh look at your lifestyle.

पारनेरच्या बनावट बियाण्याचे मूळ सापडले पण कुळच नाही; पहा तपासात काय आलेय पुढे

अहमदनगर : खरिपाच्या तोंडावर पारनेर तालुक्यात एका कंपनीचे बनावट बियाणे पकडण्यात आलेले आहे. मात्र, हे फ़क़्त हिमनगाचे टोक असून आणखी किती मोठ्या प्रमाणावर असा शेतकरी फसवणुकीचा उद्योग चालू असेल अशीच शंका यानिमित्ताने व्यक्त होत असतानाच पारनेरच्या बियाणे प्रकरणाचे कुळ आणि मूळ अजूनही सापडू शकलेले नाही.

Advertisement

पटेल सिडस् कॉर्पोरेशन, जालौन, उत्तरप्रदेश या कंपनीचे ६ टन बनावट वाटाण्याचे बियाणे पंचायत समितीचे कृषी अधिकारी बळीबा उघडे यांना पारनेर बसस्थानकासमोर (दि. ३ जून) पकडले होते. याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. त्यावर पोलीस पुढील तपास करीत आहेत. मात्र, पारनेरमध्ये नेमक्या कोणत्या व्यापाऱ्याकडे हे बियाणे आले याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिलेली नाही.

Advertisement

Advertisement

वाटाण्याच्या बियाण्याची किंमत ६ लाख रूपये असल्याचे कृषी विभागाने म्हटले होते. कंपनीकडे राज्याच्या कृषी संचलनालयाचा बियाणे विक्रीचा परवाना नसल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आल्याने कृषी विभागाच्या पथकाने मोटार चालकासह आणखी एका व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांना अजूनही हे बियाणे पारनेरमध्ये आणणारा व्यापारी किंवा दलाल सापडू शकलेला नाही. पारनेर शहर अथवा तालुक्यात बनावट बियाणे मागवणारा व्यापारी कोण, हाच मुद्दा या चौकशीतून पुढे येत नसल्याने आता हे प्रकरण शांत होणार असेच चित्र आहे.

Advertisement

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply