Take a fresh look at your lifestyle.

भारताच्या झटक्याने पाकिस्तान घायाळ; पहा जगामध्ये कसा उठलाय ‘बाजार’..!

दिल्ली : पाकिस्तानी न्यूज एजन्सी डॉनच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात  भारतीय तांदळामुळे पाकिस्तानच्या तांदळाच्या निर्यातीला नुकसान करीत आहेत. पाकिस्तानच्या तांदूळ व्यापार्यांाच्या प्रतिनिधीने सांगितले की, इम्रान सरकारने भारताविरूद्ध वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (डब्ल्यूटीओ) कडे हा मुद्दा उपस्थित करावा. जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.

Advertisement

अनेक संकटांनी घेरलेल्या पाकिस्तानची मुजोरी काही केल्या कमी व्हायला तयार  नाही. काहीही कारण नसताना हा देश भारतास त्रास देण्याचे कारण शोधतच असतो. या प्रयत्नात मात्र पाकिस्तानचेच जास्त नुकसान होत आहे. आता ही पाकिस्तानला असाच जोरदार झटका बसला आहे, त्यामुळे या देशाचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तान आता तांदळाच्या निर्यातीवर ओरडू लागला आहे. तांदळाच्या निर्यातीसंदर्भात भारतासमोरील आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तानला नुकसान सहन करावे लागत आहे. कमी किंमतीत तांदळाची निर्यात केल्याने त्याचा निर्यात व्यवसाय ढासळत चालला आहे आणि तांदूळ उद्योगाला मोठा फटका बसत आहे, असा पाकिस्तानने आरोप केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) करणार असल्याचे सांगितले आहे.

Advertisement

गेल्या वर्षीच्या तुलनेत पाकिस्तानच्या तांदळाच्या निर्यातीत लक्षणीय घट झाली आहे. जुलै 2020 ते मे 2021 या कालावधीत पाकिस्तानी तांदळाची बासमती आणि अन्य प्रकारच्या तांदळाची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत 87.8787 दशलक्ष टनांच्या तुलनेत पाकिस्तानने या आर्थिक वर्षात 3.3 दशलक्ष टन तांदळाची निर्यात केली आहे.

Advertisement

या अहवालात दावा करण्यात आला आहे की भारताने इतर देशांना पाकिस्तानपेक्षा कमी भावात तांदूळ पुरवठा सुरू केला आहे, ज्यामुळे निर्यात कमी झाली आहे. पाकिस्तान तांदूळ निर्यातदार संघटनेने म्हटले आहे की, भारताने तांदूळ प्रति टन सरासरी 360 च्या दराने देऊ केला आहे, तर पाकिस्तान 450 डॉलर प्रति टन दराने विकत आहे. भारताकडून प्रति टन सुमारे 100 डॉलर्सच्या फरकामुळे पाकिस्तानच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. डब्ल्यूटीओच्या नियमांनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात अनुदानित अन्न, विशेषत: तांदूळ कमी दराने विकणे चुकीचे आहे. फक्त पाकिस्तानच  नाही तर व्हिएतनाम, कंबोडिया, म्यानमार आणि नेपाळ या देशांनाही भारताच्या या कार्यावाहीचा  फटका बसला आहे, असा आरोप पाकिस्तानने केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.