Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार भरणार कर्मचाऱ्यांचा पीएफ, पाहा कोणाला मिळणार लाभ..?

नवी दिल्ली : कोरोनामुळे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ दिली.

Advertisement

विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काही सवलती जाहीर केल्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंड, अर्थात PF चा खर्च आता केंद्र सरकार उचलणार आहे.

Advertisement

ज्या कंपन्यांमध्ये हजार किंवा त्यापेक्षा कमी कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांच्या कंपनी PF चा, तसेच कर्मचाऱ्यांच्या वाट्याचा PF केंद्र सरकार भरणार आहे. ज्या कंपन्यांमध्ये हजारांहून अधिक कर्मचारी आहेत, अशा कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वाट्याचा PF केंद्र सरकार देणार आहे.

Advertisement

जे कर्मचारी प्रॉव्हिडंट फंडच्या वेबसाईटवर (EPFO) रजिस्टर नव्हते किंवा कोरोना काळात ज्यांचा रोजगार गेला, अशा कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 15,000 किंवा त्यापेक्षा कमी पगार असणारे कर्मचारी ज्यांची कंपनी EPFO निगडीत आहे, तसेच ज्यांचा रोजगार 01.03.2020 ते 30.09.2020 या कालावधीत गेला, अशा कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Advertisement

केंद्र सरकारकडून ही योजना 1 ऑक्टोबर 2020 रोजी लागू करताना 30 जून 2021 पर्यंत त्यास मुदत दिली होती. मात्र, आता केंद्र सरकारने या योजनेला मुदतवाढ दिली आहे.

Advertisement

दरम्यान, कोरोनाबाधित क्षेत्रांसाठी अर्थमंत्र्यांनी 1.1 लाख कोटी रुपयांची पतहमी योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत आरोग्य क्षेत्रासाठी तब्बल 50,000 कोटी, तर इतर क्षेत्रांसाठी 60,000 कोटी रुपयांच्या कर्जाची हमी सरकारने जाहीर केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply