Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ कंपन्यांना झटका देण्यासाठी केंद्र सरकार सरसावले; पहा नेमके काय म्हटलेय वाणिज्य मंत्र्यांनी

दिल्ली : कोरोना काळात देशात ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. त्यातच या कंपन्या डिस्काऊंटचेही अमिष दाखवत आहेत. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पद्धतीने खरेदी करत आहेत. कंपन्यांना याचा मोठा फायद होत आहे. त्यामुळे सुद्धा कंपन्यांनी मनमानी करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. अशावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनीही ई-कॉमर्स कंपन्यांना कठोर शब्दात फटकार लगावत इशारा दिला आहे.

Advertisement

देशातील ई-कॉमर्स कंपन्या आणि केंद्र सरकारच्या रडारवर आल्या आहेत. या कंपन्यांची मनमानी रोखण्यासाठी केंद्र सरकारने काही कठोर पावले उचलली आहेत. केंद्र सरकारचे मंत्री देखील या कंपन्यांना चांगलेच फटकारत आहेत. गोयल म्हणाले, की ‘या कंपन्यांच्या वर्तणुकीत अहंकार जाणवत आहे. त्यामुळे या कंपन्या देशातील कायदे सुद्धा मान्य करायला तयार नाहीत. मनमानी पद्धतीने दरवाढ करत आहेत, आणि देशातील कायद्यांचे पालन या कंपन्या करत नाहीत. विशेषतः अमेरिकी ई-कॉमर्स कंपन्या आपल्या अधिकारांची भिती दाखवत आहेत. त्यामुळे देशातील सर्व कंपन्यांना कायद्यांचे पालन करायलाच हवे,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या कंपन्या देशातील कायद्यांचे पालन करत नसल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

Advertisement

या ई-कॉमर्स वेबसाइच्या मनमानी कारभाराच्या विरोधात अनेक ग्राहक आणि लहान व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्या. आता या तक्रारींची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. या कंपन्याच्या मनमानी कारभारास चाप लावण्याच्या उद्देशाने सरकार लवकरच ऑनलाइन शॉपिंगसाठी काही नियम बनवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तसेही, या कंपन्यांमुळे देशातील लहान व्यापऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या व्यापाऱ्यांच्या संघटनांनी केंद्र सरकारकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. कोरोना काळात संकटाचा फायदा घेत या कंपन्यांनी अगदीच मनमानी केल्याचे सरकारच्याही लक्षात आले. त्यामुळे सरकारने सुद्धा या कंपन्यांना अद्दल घडवण्याच्या उद्देशाने नियम आधिक कठोर करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. सरकारच्या या धोरणामुळे भविष्यात केंद्र सरकार आणि या कंपन्यात वाद आधिकच वाढण्याची शक्यता दिसत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.