Take a fresh look at your lifestyle.

अवघा देश भीतीयुक्त ‘ऑक्सिजन’वर; तरीही राजकारण्यांचा मिटेना घोळ..!

दिल्ली : कोरोना काळातील ऑक्सिजनच्या मुद्द्यावर राजधानी दिल्लीत राजकारण चांगलेच तापले आहे. ऑक्सिजन ऑडीट कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर विरोधकांनी केजरीवाल सरकारवर टीकेची भडीमार केला आहे. भाजप नेते, पदाधिकारी पत्रकार परिषदा घेत मुख्यमंत्री अरविंद यांच्यावर आरोप करत आहेत. तर दुसरीकडे हरयाणा आणि दिल्ली सरकार यांच्यातही नवा वाद निर्माण झाला आहे. कोरोना काळातील ऑक्सिजनच्या रिपोर्टच्या मुद्द्यावर दोन्ही राज्यात वाद निर्माण झाला आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत दिल्ली सरकारने गरजेपेक्षा चार पट जास्त ऑक्सिजनची मागणी केली. त्यामुळे हरयाणा राज्यावर त्याचा परिणाम झाला. ऑक्सिजन अभावी येथे लोकांचा मृत्यू झाला, असा आरोप हरयाणा सरकारने केला आहे.

Advertisement

राज्याचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी तर कोरोना काळात दिल्ली सरकारने हरयाणाच्या वाट्याचे ऑक्सिजनचे टँकर लुटले, असा थेट आरोप केला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की खोटी माहिती देत दिल्ली सरकारने कोरोना काळात गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन मिळवल्याने अन्य राज्यांवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे या राज्यात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आणि ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांनी केला.

Advertisement

दरम्यीन, देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात तिसरी लाट आली तरी आता या लाटेचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. तिसरी लाट आलीच तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नियोजन करण्यास सुरुवात केली. देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले. नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतील याचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यास तयार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply