Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. म्हणून पावसाचा आठवडा कोरडाच; पहा नेमका कशाचा फटका बसला पेरण्यांना

नाशिक : मान्सूनचा पाउस वेळेवरच सुरू झाला. मात्र, नंतर अनेक भागात मॉन्सूनला खोडा बसला आणि पावसाचे दिवस कोरड्या दिवसात बदलले. परिणामी अनेक भागात पेरण्या करूनही फटका बसला तर काही भागात पेरण्या रखडल्या. आताही पावसाचा एक आठवडा कोरडा राहण्याचा अंदाज आहे.

Advertisement

उत्तर भारतात दाखल झाल्यापासून मान्सूनचा वेग मंदावला आहे. त्याला कारण ठरले आहे ते मेडेन ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ), पश्चिमी चक्रावात (वेस्टर्न डिस्टर्बन्स), मोसमी वाऱ्यांचा मंद वेग आणि समुद्रात कमी दाबाचा अभाव या घटकांचे. परिणामी राज्याच्या काही जिल्यात तब्बल ४० टक्के इतका पाऊस कमी झालेला आहे. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सूनसाठी आ‌वश्यक मानली जाणारी व हिंदी महासागरात एमजेओ ही हवामानासंबंधीची दोलायमानता अनुकूल नसल्याचा फटका बसत आहे.

Advertisement

Advertisement

महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला असून जूनचा शेवटचा आठवडाही कोरडा जाण्याची शक्यता आहे. सध्या दिल्ली, हरियाणा आणि पंजाब सीमेवर थबकला असून त्या भागातही शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात अहमदनगर ०६ %, धुळे ४० %, जळगाव १५ %, नंदुरबार ४१ %, नाशिक ०३ %, सोलापूर १७ %, अकोला ४८ % आणि बुलडाणा १२ % या जिल्ह्यात पावसाची तुट आलेली आहे. त्यातच जूनचा शेवटचा आठवडाही कोरडा जाण्याची शक्यता हवामान विभागासह तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply