Take a fresh look at your lifestyle.

आरोग्यदायी माहिती वाचा आणि निरोगी राहा; पहा महत्वाचे मुद्दे

सध्याच्या काळ हा ताण तणावांचा काळ आहे. कारण आज मानवी जीवनात अनेकांना ताण तणावाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आजच्या धकाधकीच्या काळात मानसिक आरोग्य दुर्लक्षित राहत आहे. परंतु, निरोगी आरोग्यासाठी मानसिक आरोग्य चांगले असणे सुद्धा खूप महत्वाचे आहे. मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग आणि ध्यानधारणा करणे हे उत्तम पर्याय आहेत. याशिवाय चांगल्या व तुमच्या आवडत्या कामांमध्ये सहभाग नोंदवा व आनंदी राहा. तणावांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

Advertisement

आजच्या धावपळीच्या जमान्यात आरोग्याकडे लक्ष देणे कठीण होत आहे. बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ताणतणावामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. आरोग्याकडे लक्ष देऊन तंदुरुस्त राहणे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळे काही नियमांचे कटाक्षाने पालन केले तर निरोगी राहता येणे शक्य आहे. फक्त त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करायला हवेत. तसेही फार काही करण्याची गरज नाही. आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या छोट्या गोष्टी पाळल्या तरी खूप आहे. चला तर मग काय आहेत हे नियम याबद्दल जाणून घेऊ या…

Advertisement

Advertisement

निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार घेणे तसेच आहाराच्या वेळा पाळणे महत्वाचे आहे. आज मात्र तसे होताना दिसत नाही. फास्ट फूड, जंक फूडचे प्रमाण वाढत आहे. मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाण्यामुळे सुद्धा आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. मात्र, यावर नियंत्रण मिळवायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे, पौष्टिक व संतुलित आहार घेणे अतिशय गरजेचे आहे. आपल्या आहारात विशेषत: फळे, भाज्या, अन्नधान्य, प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यामुळे तुमच्या आरोग्यास पोषक घटकांचा पुरवठा होण्यास मदत मिळेल.

Advertisement

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतली तर मानसिक थकवा दूर होतो. तसेच शरीराला सुद्धा आराम मिळतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये. मानवी जीवनात व्यायामाचे एक वेगळेच महत्व आहे. शरीर तंदुरुस्त ठेऊन आजारांना दूर ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनकडून प्रत्येक आठवड्यात १५० मिनिटे व्यायाम करण्याचा किंवा आठवड्यातून किमान तीन वेळा व्यायाम करण्यास सांगण्यात आले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply