Take a fresh look at your lifestyle.

‘म्हणून करकरे देशभक्त नाहीत..!’; पहा नेमके काय म्हटलेत भाजप खासदार सिंग यांनी

पुणे : मुंबई शहरावर नव्हे तर थेट भारतावरच झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले आणि अनेक दहशतवाद्यांना तुरुंगात डंबणारे शहीद हेमंत करकरे हे आज पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. भाजप खासदार आणि हिंदुत्ववादी असल्याचे सांगणाऱ्या प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी ‘काही लोकांसाठी देशभक्त असतील, मात्र मी करकरेंना देशभक्त मानत नाही’ असे म्हटलेले आहे.

Advertisement

ANI on Twitter: “#WATCH | BJP MP Pragya Thakur says, “An Emergency was imposed in 1975 & an Emergency-like situation had formed in 2008 when Sadhvi Pragya Singh Thakur was jailed in Malegaon blast case…People call Hemant Karkare a patriot, but those who are real patriots don’t call him one…” https://t.co/UgplzFd1d7″ / Twitter

Advertisement

आपल्या उलटसुलट वक्तव्यांनी आणि कृतीने सतत चर्चेत राहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी असे म्हटल्याने अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात. पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना देशभक्त मानत नाहीत. देशासाठी मी माझं जीवन समर्पित केलं आहे. माझ्यासारख्या स्वयंसेवकाला त्यांनी त्रास दिला, असे त्यांनी त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये म्हटलेले आहे.

Advertisement

Advertisement

१९७५ च्या आणीबाणीप्रकरणी जसे झाले तसेच २००८ मध्ये करून आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोपही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे. शिक्षण देणाऱ्या आचार्यांच्या हाताची बोटं हेमंत करकरे यांनी तोडल्याचेही त्यात प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलेले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांना एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी अटक करून चौकशी केली होती. करकरे यांच्या मृत्यूबाबत अनेकदा संशय व्यक्त झालेला आहे. त्यात आता ही नवी भर पडली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply