Take a fresh look at your lifestyle.

‘राज्यपालांची उत्तरे असमाधानकारक..’; त्यासाठी भाकप व किसान सभेने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे शिष्टमंडळ आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आज सकाळी ११ वाजता भेटले. त्यावेळी त्यांना मागण्यांचे पत्र दिले. मात्र, राज्यपालांची ऊत्तरे समाधानकारक नाहीत. त्यामुळे मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याची घोषणा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेत्यांनी केली आहे.

Advertisement

या शिष्टमंडळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे महाराष्ट्र अध्यक्ष कॉ. मधुकर पाटील, ठाणे जिल्हा किसानसभा अध्यक्ष कॉ. आत्माराम भिसे, पालघर जिल्हा किसान सभा अध्यक्ष कॉ. माधव चौधरी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश नार्वेकर यांचा समावेश होता.

Advertisement

महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले. नवे किसानविरोधी काळे कायदे रद्द करावेत, एमएसपीचा ठोस फॉर्मुला निश्चित करावा, खरेदीची गॅरन्टी आदि मागण्यांबरोबरच देशात लोकशाहीला मारक अशी दडपशाहीची परिस्थिती केंद्र सरकारने निर्माण केली आहे त्यावर घटनात्मक पायबंद घालावा आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या. हे निवेदन राष्ट्रपती कार्यालयास पोहोचवावे अशी मागणीही करण्यात आली. राज्यपालांनी या मागण्यांवर थेट ऊत्तर देणे टाळले. तसेच आणिबाणीसारखी परिस्थिती नाही असे मत त्यांनी मांडले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply