Take a fresh look at your lifestyle.

आहेत ना पैसे..? मग ‘महाराजा’च्या ‘एअर इंडिया’च्या जागा न घरे निघालेत की विक्रीला..!

मुंबई : करोना विषाणूच्या संकटाने अवघ्या भारत देशात गरीब व मध्यम वर्गीयांना झटका दिला आहे. तर, ज्यांच्याकडे पैसे पडून आहेत अशा श्रीमंतांना अच्छे दिन आलेले आहेत. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब आणखी गरीब करणारा हा कालावधी आहे. याच कालावधीत जर तुमच्याकडे पैसे असतील तर मग ‘महाराजा’च्या ‘एअर इंडिया’च्या जागा न घरे खरेदीची ही सुवर्णसंधी आलेली आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ‘क्रांतिकारी’ निर्णय घेताना सध्या निर्गुंतवणूक धडाका लावला आहे. त्यातील महत्वाची कंपनी म्हणजे एअर इंडिया. या कंपनीच्या मालमत्ता विक्रीतून ३०० कोटी रुपये उभारणी करण्याचे सरकारचे नियोजन आहे. कर्जबाजारी झालेली सरकारी मालकीची विमान कंपनी विकतानाच या जागाचे लिलाव केले जात आहेत. एअर इंडियाने देशभरातील १० शहरांतील २७ मालमत्ता विकायला काढलेल्या आहेत. त्यात महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि मुंबईतील कंपनीची बुकिंग कार्यालये आणि कर्मचारी निवासाचा समावेश यांचाही समावेश आहे. पुढील महिन्यात ई-बीडद्वारे विक्री प्रकिया पूर्ण केली जाणार आहे.

Advertisement

Advertisement

दि. १८ जून रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रकाशित जाहिरातीनुसार दि. ८ जुलै रोजी ऑनलाईन बोली लावण्यास (ई-बिडींग) सुरूवात होणार आहे. औरंगाबादच्या २, मुंबई ३, नाशिक ६, नागपूर १, भुज २, बेंगळुरू १, कोलकाता ४, मंगळुरू २, नवी दिल्ली ५ आणि तिरूवनंतपूरम शहरातील १ अशा १० शहरातील २७ मालमत्ता विक्रीस काढल्या आहेत. सर्वाधिक १२ मालमत्ता महाराष्ट्रातील आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply