Take a fresh look at your lifestyle.

आहात ना तयार..? येणार आहे मुसळधार पाऊस; पहा हवामान विभागाचा अंदाज काय तो

पुणे : यंदा मोसमी पाऊस जोरदार होईल असाच अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. त्यानुसार वेळेवरच मॉन्सून महाराष्ट्रासह देशभरात दाखल झाला. मात्र, आता नंतर पावसाने बऱ्याच भागात खंड घेतला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, कालपासून आता राज्यात पावसाचे पुनरागमन होत आहे. पुढील चार दिवसात अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलेले आहे.

Advertisement

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार तासात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुढील पूर्ण आठवड्यासाठी कोकण आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी हा पाऊस मात्र काही तुरळक ठिकाणीच होईल. बहुतांश राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.

Advertisement

Advertisement

देशात मान्सून दाखल झाला असून अगदी सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर मात्र पावसाने काही ठिकाणी उघडीप दिली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. मात्र, पाऊस होत नाही अशी परिस्थिती आहे. मात्र, आता पुढील तीन ते चार तासात राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीला अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. राजधानी मुंबईत तर पावसाने दाणादाण उडवली होती. मात्र, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. काही दिवसांपासून पाऊस झालेला नाही. मात्र, आता तीन ते चार दिवसात पुन्हा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस नसला तरी कोकणात मात्र अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे.

Advertisement

यंदा मान्सूनमध्ये देशभरात चांगला पाऊस होईल असा अंदाज याआधीच व्यक्त करण्यात आला आहे. त्याचा प्रत्ययही येत आहे. सुरुवातीलाच चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे यंदा पाण्याची कमतरता जाणवणार नाही. यंदा बदललेल्या हवामानाचाही अनुभव नागरिकांना मिळाला. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. तौक्त चक्रीवाादळामुळेही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मे महिन्यात देशभरात अनेक ठिकाणी पावसाचेच वातावरण होते. त्यानंतर आता मान्सून दाखल झाला आहे. यावेळीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply