Take a fresh look at your lifestyle.

चीनचा असाही कारनामा; ‘त्या’ वादग्रस्त प्रयोगशाळेलाच देणार पुरस्कार; अमेरिकेलाही दिलेय प्रत्युत्तर

दिल्ली : कोरोना विषाणूच्या उगमाच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनची चांगलीच कोंडी केली आहे. कोरोना वायरस वुहान प्रयोगशाळेतुनच लीक झाल्याचा दावा केला जात आहे, काही शास्त्रज्ञांनी तसे पुरावे सुद्धा मिळाले असल्याचे सांगितले आहे. जगभरातील विविध संस्थांचे जे अहवाल येत आहेत, त्यातही हा विषाणू प्रयोगशाळेतूनच पसरल्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे, तसे आरोपही चीनवर सातत्याने होत आहेत.
अमेरिकेने तर एक पाऊल पुढे टाकत या विषाणूचा ठावठिकाणा हुडकून काढण्याचे आदेश आपल्या गुप्तचर संस्थांना दिले आहेत. या घडामोडींमुळे चीन नरमेल, असे वाटत होते. मात्र, याचा काहीच परिणाम चीनवर झालेला नाही. उलट, चीनने आता असा कारनामा केला आहे, ज्यामुळे निश्चितच अमेरिकेचा तिळपापड होणार आहे.

Advertisement

आतापर्यंत वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून कोरोना लीक झाल्याचा दावा केला जात होता, त्या प्रयोगशाळेलाच सर्वोच्च पुरस्कार देण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. कोरोना विषाणू आटोक्यात आणण्यासाठी या प्रयोगशाळेने चांगली कामगिरी केल्याचे सांगत ‘चायनीज अॅकेडमी ऑफ सायन्सेस’ ने ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी’ स हा पुरस्कार जाहीर केला आहे. या प्रयोगशाळेने केलेल्या अनेक महत्वाच्या संशोधनांद्वारे कोरोना विषाणूचा उगम, महामारीचे विज्ञान समजण्यास मदत मिळाली, असेही अॅकेडमीने सांगितल्याचे काही अहवालात म्हटले आहे. प्रयोगशाळेने कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी तसेच कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे.

Advertisement

दरम्यान, याआधी अमेरिकेचे विषाणू तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांनी पुन्हा एकदा चीनवर संशय व्यक्त केला होता. त्यांनी एका मुलाखतीत असे म्हटले होते, की कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तयार केलेला असू शकतो. कोरोना विषाणू प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा जो दावा केला जात आहे त्यामागे सुद्धा असाच संशय व्यक्त केला जात आहे की कोरोना हा घातक विषाणू प्रयोगशाळेतच तयार केलेला असू शकतो.

Advertisement

हा विषाणू एखाद्या दुर्घटनेत वुहान प्रांतातील प्रयोगशाळेतून बाहेर पडला असण्याची सुद्धा शक्यता आहे. चीन तसाही विश्वासघातकीच आहे आणि जगाला याचा अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे चीनचा हा आणखी एक डाव सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चीनच्या या अशा कृत्यांमुळे जगाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, याची आजिबात शक्यता नाही. आता चीनच्या या निर्णयावर अमेरिका आणि जगातील अन्य देश काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट   मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा. 

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply