Take a fresh look at your lifestyle.

संकटात दिलासा… ‘त्या’ अडचणीतून होणार ग्रामपंचायतींची सुटका; पहा, काय निर्णय घेतलाय राज्य सरकारने

कोल्हापूर : कोरोना महामारीचा राज्याच्या ग्रामीण भागास मोठा फटका बसला आहे. दुसऱ्या लाटेत शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त रुग्ण आढळून येत होते. या संकटकाळात येथेही नागरिकांचे रोजगार गेले, बेरोजगारी वाढली. ग्रामपंचायतींचे उत्पन्न घटले, त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. गावातील जनकल्याणाच्या योजनांचे कामकाज रखडले. पथदिवे, पाणीपुरवठा योजनांचे थकबाकी कशी द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला. आता मात्र, राज्य सरकारनेच या प्रश्नांची सोडवणूक केली आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींन पथदिवे आणि पाणी पुरवठ्याची देयके देता येतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोरोना संकटाच्या काळात राज्यातील ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे.

Advertisement

कोरोनाच्या संकटात ग्रामपंचायतींच्या अडचणी वाढल्या होत्या. अनेक ठिकाणी पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके अदा न झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सद्य परिस्थिती पाहता पंधराव्या वित्त आयोगाच्या अबंधित अनुदानातून पथदिव्यांची देयके आणि बंधित अनुदानातून पाणीपुरवठा योजनांची देयके अदा करण्यासाठी बुधवारी जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकान्वये मान्यता देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने त्यांना प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ही देयके अदा करायची आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळणार असून देयकांच्या पूर्ततेअभावी कोणत्याही गावात पथदिव्यांची वीज किंवा पाणीपुरवठा योजना आता बंद पडणार नाही, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

Advertisement

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ८०: १०: १० या प्रमाणात अनुक्रमे ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे. त्यामुळे या निधीचा खर्च कसा करावा याबाबत काही सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत. कोविड १९ व्यवस्थापनासाठी सुद्धा हा निधी खर्च करता येईल, असे सांगण्यात आले आहे.  त्यानंतर आता आणखी काही महत्वाच्या कामांसाठी निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली.

Advertisement

राज्यात थकबाकी आणि वेळेत विजेचे बिल भरले नाही, म्हणून पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कट करण्याचे प्रकार नेहमीच होत असतात. आताही असे प्रकार सुरूच आहेत.  ग्रामपंचायतींकडे निधी नसल्याचे बऱ्याचदा असे घडते.  याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागतो. पाणी असतानाही त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.  सध्याच्या कोरोना काळात तरी त्यांचा हा त्रास कमी व्हावा, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा. 

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply