Take a fresh look at your lifestyle.

लिलावात काढलेले सोने बनावट निघाले..! नगरमध्ये कर्जदारांनी ‘या’ बँकेलाच घातलाय लाखो रुपयांचा गंडा..!

अहमदनगर : सोने तारण ठेवून अनेक बँका आपल्या ग्राहकांना कर्ज देत असतात. मात्र, काही कर्जदारांनी चक्क बनावट (बेन्टेक्स) सोने तारण ठेऊन कर्ज घेतले. नंतर कर्जही फेडले नाही. त्यामुळे बँकेने तारण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लिलावासाठी जेव्हा कर्जदारांनी दिलेले सोने बाहेर काढले, तेव्हा ते बनावट असल्याचे समोर आले.

Advertisement

अहमदनगरमधील नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत हा प्रकार झाला आहे. शेवगाव तालुक्यातील अनेकांनी नगर अर्बन बॅंकेच्या शाखेतून सोने तारण ठेऊन कर्ज घेतले होते. मात्र, कर्ज घेतल्यावर त्यांनी बँकेकडे पाठ फिरवली. अनेकदा नोटिसा बजावूनही कर्जदार कर्ज फेडत नसल्याचे पाहून बँकेने तारण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

नगर अर्बन बँकेच्या नगर शहरातील मुख्य शाखेत सोन्याची लिलाव प्रक्रिया सुरु झाली. त्यासाठी पिशव्यांमधून सोने बाहेर काढण्यात आले असता, पहिल्या पाच पिशव्यांमधील सोन्याचे दागिने बेंटेक्सचे असल्याचे समोर आले.

Advertisement

या प्रकारामुळे उपस्थित सभासद, बँक प्रशासक आणि लिलावात सहभागी झालेल्या सोनारांमध्येही गोंधळ उडाला. आता या प्रकरणात बँक आणि पोलिस काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Advertisement

असे ओळखा बनावट सोने..?

Advertisement
  • बादलीतील पाण्यात सोन्याचे दागिने बुडाले, तर सोनं खरं.. मात्र, काही काळ जरी पाण्यावर तरंगले, तर समजून घ्यायचं की सोनं बनावट आहे.
  • सोन्याच्या दागिन्यांवर व्हिनेगरचे थेंब टाका, रंग बदलला नाही, तर खरं सोनं समजावं. रंग बदलला तर ते सोने बनावट आहे.
  • पिनच्या साहाय्याने सोन्यावर स्क्रॅच करा. त्या स्क्रॅचवर नायट्रिक अॅसिडचा थेंब टाका. बनावट सोने त्वरीत हिरवे होते. खऱ्या सोन्यावर काहीच परिणाम होत नाही. 

सोनेखरेदी करण्यापूर्वी ते खरं आहे की बनावट, याची माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठीच मोदी सरकारने आता दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना शुद्धतेची हमी मिळत असली, तरी एखादा सोनार आपली फसवणूक करीत असेल, तर ते ओळखता आले पाहिजे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply