Take a fresh look at your lifestyle.

म्हणून चालू आहे चाय गरम, चाय गरम..! पहा कशामुळे झाली २५ टक्के दरवाढ

मुंबई : चहा म्हणजे भारतीयांचे लाडके पेय. संवादाला मार्ग आणि दिशा देणाऱ्या या पेयासाठी लागणारी चहापत्ती सध्या लैच गरम झालेली आहे. जगभरातील मागणी आणि पुरवठा यातील तफावत वाढल्याने चहाचे भाव वर्षभरात तब्बल २५ टक्के इतके वाढलेले आहेत. मात्र, पुढील काही कालावधीत ते कमी होतील अशी शक्यता चहातज्ञांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

अनुकूल वातावरणाअभावी आसाममधील चहाच्या उत्पादनावर जसा परिणाम झाला तसाच प्रकार जगभरातील चहा उत्पादक पट्ट्यात झालेला आहे. परिणामी चहाचे भाव वधारलेले आहेत. २०१९ च्या पहिल्या तिमाहीत चहाची निर्यात ३.९६ कोटी किलो झाली होती. तीच २०२१ च्या पहिल्या तिमाहीत घटून ती २.७३ कोटी किलोवर आली. केन्याई सीटीसी चहाचे दर कमी असल्याने अफ्रिकन देशात मागणी वाढली असून त्याचा परिणाम आपल्या चहा पिण्यावरही झालेला आहे.

Advertisement

देशात निम्म्याहून अधिक चहाचा पुरवठा आसाम या एकट्या राज्यातून होतो. २०२० मध्ये चहाचे दर १७८.६ रुपये प्रतिकिलो होते. तेच २२४ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत.पारंपरिक चहा म्हणजे चहाची पाने मजूर आपल्या हाताने तोडतात. पूर्ण पानाची चहा अशाच प्रक्रियेद्वारे तयार केली जाते. तर, मिलमध्ये बेलनाकार रोलर्सवर प्रक्रिया केलेल्या चहाला सीटीसी चहा म्हटले जाते. या दोन्ही चहाचे भाव वाढलेले आहेत. जुलै महिन्यात उत्पादन वाढण्याची अपेक्षा असून किमतीही कमी होण्याची आशा या क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply