Take a fresh look at your lifestyle.

जयंतरावांच्या हातातच नगरची सूत्रे; राष्ट्रवादीच्या दिग्गजांना नाही तर, नातेवाईकांना संधी..!

अहमदनगर : जिल्ह्यातील महत्वाची सत्ताकेंद्रे नातेवाईकांसह ताब्यात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी नगर जिल्ह्यावर आपली पकड आणखी घट्ट केली आहे. नातेवाईक असेलल्या तनपुरे, घुले आणि काळे कुटुंबियांना महत्वाच्या ठिकाणी संधी देऊन जयंतरावांनी सर्वांना मोठी ओवाळणी दिल्याची चर्चा आहे. त्याचवेळी अनेकांची नाराजीही आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यापेक्षा नगरवर पाटलांचे जास्त प्रेम आणि लक्ष असल्याची चर्चा त्यामुळे सुरू झालेली आहे.

Advertisement

शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षपदी आपलीच वर्णी लागावी यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक दिग्गजांनी कंबर कसली होती. मात्र, या निवडीतही जयंत पाटील यांनी आपलाच वरचष्मा कायम असल्याचे दाखवून दिले आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांचे पुत्र, माजी खासदार शंकरराव काळे यांचे नातू, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या कोपरगावचे 35 वर्षीय युवा आमदार असलेल्या आशुतोष काळे यांना पक्षाने संधी दिली आहे. आमदार काळे हे जयंत पाटील यांच्या भगिनी व माजी आमदार नरेंद्र पाटील घुले यांच्या पत्नी नीलिमा यांच्या पुतणीचे पती आहेत. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची कन्या चैताली यांचे आशुतोष काळे हे पती आहेत.

Advertisement

Advertisement

साई संस्थानाच्या अध्यक्षपदी आपल्या एका नातेवाईकांस संधी देतानाच यापूर्वी जयंत रावांनी जिल्ह्यातील आपले भाचे व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनाही राज्य मंत्रिमंडळात स्थान दिलेले आहे. विशेष म्हणजे काळे व तनपुरे हे दोन्ही कुटुंबीय अगोदरच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना या पक्षात होते. आताच्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही कुटुंबीयांनी स्वगृही येऊन आमदारकी जिंकण्यासह दमदार पद मिळवले आहेत. तर, घुले कुटुंबातील माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या पत्नी असेलल्या राजश्री घुले यांनाही जयंतरावांनी जिल्हा परिषद अध्यक्ष या पदावर संधी दिली आहे.

Advertisement

एकूणच नातेवाईकांना संधी देऊन जयंतरावांनी जिल्ह्यावर प्रेम असलेले दाखवतानाच आपला वरचष्मा कायम राखला आहे. या पदावर संधी मिळण्यासाठी पारनेरचे आमदार व महाराष्ट्रात ओळख पक्की केलेले निलेश लंके हेही इच्छुक होते. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे तर दुसऱ्यांदा आमदार असल्याने त्यांना संधी मिळावी अशीच त्यांच्या समर्थकांची इच्छा होती. इतरांनीही आपापल्या समर्थकांच्या मदतीने या पदावर संधी मिळण्यासाठीची फिल्डिंग लावल्याचे बातम्यांतून स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे या सर्वांची नाराजी पक्षाचे नेतृत्व कशी काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मात्र, सर्व नेते आणि शक्यतांना बाजूला सारून आशुतोष काळे यांना संधी देत उत्तर नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवण्याचा विचार करून पक्षाने कोपरगावला ही महत्वाची संधी दिली आहे. ते त्याचे कसे सोने करतात यावरच पुढील दिशा ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply