Take a fresh look at your lifestyle.

आता मोबाइल फोनद्वारेच होईल कोरोनाची तपासणी; पहा, कुणी केलेय ‘हे’ अनोखे संशोधन

दिल्ली : कोरोना जसा आला तसा हा आजार थोपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही या आजारावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेला नाही. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जास्तीत जास्त तपासण्या करुन रुग्ण शोधण्याचे काम सुरुच आहे. मात्र, हे काम जितक्या वेगाने होईल, तितक्याच वेगाने रुग्ण सापडून त्यांच्यावर उपचार करता येणार आहेत. परिणामी या आजाराचा प्रसारही रोखता येणार आहे. याच उद्देशाने जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत होते. अखेर ब्रिटनमधील युनिवर्सिटी कॉलेजच्या संशोधकांना कोविड १९ ची तपासणी करण्याचा एक अगदीच स्वस्त आणि सोपा मार्ग सापडला आहे. कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या लोकांचे स्वॅब नमुने मोबाइल फोनद्वारे तपासले जाऊ शकतात.

Advertisement

या संशोधनात स्वॅबचे नमुने स्मार्टफोनच्या स्क्रीनवरून संकलित केले गेले आणि त्यांचे विश्लेषण केले गेले. अशा प्रकारे ते सर्व लोक संक्रमित असल्याचे आढळले, जे सामान्य पीसीआर चाचणीत सुद्धा कोरोना संक्रमित आढळले होते. या प्रक्रियेमध्ये स्वॅबचे नमुने थेट लोकांकडून गोळा करण्याऐवजी स्मार्टफोनची मदत घेण्यात आली. या नवीन पद्धतीस ‘फोन स्क्रीन टेस्टिंग’ (पीओएसटी) असे नाव देण्यात आले.

Advertisement

८१ ते १०० लोकांच्या मोबाइल फोनवरुन कोरोनाने संक्रमित लोक ओळखले गेले. या आजाराची लक्षणे त्यांच्यात स्पष्टपणे आढळली. संशोधकांनी सांगितले, की पीओएसटी चाचणी पारंपारिक पीसीआर चाचणीपेक्षा कमी खर्चिक आणि सुरक्षित आहे. ही चाचणी गरीब देशांसाठी एक उत्तम पर्याय आहे, कारण त्यासाठी मोठ्या प्रमाणात संसाधनांची आवश्यकता नाही. फोन स्क्रीन चाचणी (पीओएसटी) नमुने गोळा करण्यास एका मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो आणि वैद्यकीय तज्ञांची आवश्यकता नसते. चिलीच्या स्टार्टअप डायग्नोसिस बायोटेकच्या संशोधकांनी सांगितले, की संसर्ग रोखण्यासाठी नियमित चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु गरीब देशांमध्ये असे करणे कठीण आहे. अशा परिस्थितीत ही पद्धत त्यांच्यासाठी प्रभावी ठरेल.

Advertisement

दरम्यान, जगभरात आता कोरोना आटोक्यात येत असताना डेल्टा आणि डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. डेल्टा पेक्षाही डेल्टा प्लस हा व्हेरिएंट अतिशय घातक आहे. रशिया, ब्रिटेन, अमेरिका, इस्त्राएल या देशांत कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र, या नव्या व्हेरिएंटमुळे या देशात पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. चीनच्या काही शहरात पुन्हा रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे या शहरात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा. 

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply