Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील सत्ताधाऱ्यांचे हेच आहे धोरण; चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केलेत गंभीर आरोप

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सरकार लवकरच पडेल अशा बातम्या येत असतात. मात्र, अजून तरी असे काहीच घडलेले नाही. अधूनमधून हा मुद्दा चर्चेत येत असतो. आता सध्या राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सत्ताधारी पक्षात कुरबुरी वाढल्या आहेत. तर विरोधकांकडूनही पुन्हा या मुद्द्यास हवा देण्याचा प्रयत्न होत आहे. आताही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याच मुद्द्यावर राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. भ्रष्टाचाराचा आरोपही केला आहे.

Advertisement

‘राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला सामान्य लोकांची चिंता नाही. सत्ता किती काळ टिकेल याचा भरवसा वाटत नसल्याने सगळा भर कमाई करण्यावर आहे, त्यामुळे राज्यात भ्रष्टाचाराने टोक गाठले आहे,’ अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारचा समाचार घेतला.

Advertisement

‘राज्य सरकारच्या नेत्यांनाचा खात्री वाटत नाही की सरकार किती वर्षे टिकेल, त्यामुळेच त्यांच्याकडून सरकार पाच वर्षे टिकेल असे वारंवार सांगितले जात आहे. परंतु सत्ता उद्या जाईल तर आज कमाई करून घ्या, असे या आघाडीच्या नेत्यांचे धोरण आहे. त्यांना सामान्य लोकांशी काही देणेघेणे नाही. महाविकास आघाडीचे नेते कोडगेपणाने केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहेत. या आघाडीने भ्रष्टाचाराचे टोक गाठले आहे, तसेच खोटारडेपणाचेही टोक गाठले आहे,’ अशा तीव्र शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

Advertisement

दरम्यान, आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील अनेकांनी आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसनेही सूचक इशारा दिला होता. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत, आणि तिन्ही पक्षांनी एकत्र राहिले पाहिजे. मात्र, जर कुणी स्वबळाची भाषा करत असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या मुद्द्यावर भाष्य केले होते. त्यांनतर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, तशी विनंती पक्षाच्या वरिष्ठांना केली आहे, असे सांगितले होते. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही असेच वक्तव्य केले आहे. काँग्रेस पक्षाने निवडणुका स्वबळावर लढल्या तर पक्षाची ताकद वाढेल आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नवीन ऊर्जा संचारेल असे शिंदे यांनी म्हटले होते.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा. 

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply