Take a fresh look at your lifestyle.

… म्हणून काँग्रेसचे ‘ते’ राजकारण फार काळ टिकणार नाही; राष्ट्रवादीने केलाय ‘हा’ दावा

उस्मानाबाद : आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने केल्यानंतर राज्याच्या राजकारणात उठलेले राजकीय वादळ अजूनही थांबलेले नाही. त्यानंतर राजकीय घडामोडी आधिक वेगाने घडू लागल्या आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आक्षेप नोंदवला, इशारे दिले तरी त्याचा काँग्रेसवर तुर्तास तरी परिणाम झालेला दिसत नाही. काँग्रेसचे दबावाचे राजकारण सुरुच आहे.

Advertisement

काँग्रेसच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीने काँग्रेसला सूचक इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. राष्ट्रवादी स्वबळाची चाचपणी करत नाही. पण काँग्रेस स्वबळाचा आग्रह करत असेल, तर आघाडीतील अन्य दोन पक्ष एकत्र निवडणूक लढण्याचा विचार करतील. काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही, असे स्पष्ट करत काँग्रेसलाही सोबत घेण्याचा प्रयत्न करू, असे पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेस आज तुळजापूर येथून प्रारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी पाटील यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींबाबत मत व्यक्त केले.

Advertisement

भाजपमधून राष्ट्रवादीत येणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. कोरोना असल्याने पक्ष प्रवेश रखडले आहेत. पक्ष सोडून गेलेले स्वगृही येण्यास इच्छुक आहेत, पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल आणि टप्याटप्याने प्रवेश दिला जाईल. केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर करून अनेकांना त्रास दिला जात आहे. इन्कम टॅक्स आणि ईडीचा वापर राजकीय दबाव टाकण्यासाठी केला जातो, हे सर्वश्रुत आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राने ते अधोरेखित झाले आहे, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.

Advertisement

दरम्यान, आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. या वक्तव्यावर पटोले आजही ठाम आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील अनेकांनी आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसनेही सूचक इशारा दिला होता. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत, आणि तिन्ही पक्षांनी एकत्र राहिले पाहिजे. मात्र, जर कुणी स्वबळाची भाषा करत असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता.

Advertisement

त्यानंतर आता काँग्रेसचे नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या मुद्द्यावर भाष्य केले होते. त्यांनतर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, तशी विनंती पक्षाच्या वरिष्ठांना केली आहे, असे सांगितले होते. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही असेच वक्तव्य केले आहे. काँग्रेस पक्षाने निवडणुका स्वबळावर लढल्या तर पक्षाची ताकद वाढेल आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नवीन ऊर्जा संचारेल असे शिंदे यांनी म्हटले होते.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा. 

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply