Take a fresh look at your lifestyle.

राज्यांना ‘अशा’ पद्धतीने मिळतेय कोरोना प्रतिबंधक लस; केंद्र सरकारने सांगितले लस वितरणाचे ‘गणित’

दिल्ली : कोरोना लस आणि लसीकरण या दोन मुद्द्यांवर देशाच्या राजकारणात चांगलाच गदारोळ उडाला आहे. आजही या मुद्द्यांवर विरोधी पक्ष केंद्र सरकारला टार्गेट करत आहेत. आता तर देशात सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण सुद्धा सुरू झाले आहे. तरी देखील हा गोंधळ मिटलेला नाही. त्यामुळे आता केंद्र सरकारने राज्यांना नेमक्या कशाच्या आधारावर लस पुरवठा केला जातो, कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात, याची सविस्तर माहिती दिली आहे.

Advertisement

राज्याची लोकसंख्या, करोना रुग्णांची संख्या, लसीचा वापराबाबतची दक्षता आणि किती प्रमाणात लस वाया जाते? या सर्व गोष्टी बघून राज्यांना लस पुरवठा केला जात असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर नवीन लसीकरणाच्या धोरणातही या गोष्टींचा उल्लेख होता. मात्र, तरीसुद्धा लसींचा वाद मिटला नाही. त्यामुळे आता पुन्हा याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

Advertisement

लस वाया घालवल्यास त्याच्या पुरवठ्यावर नकारात्मक परिणाम होतो. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांची लोकसंख्या, करोना रुग्णसंख्या, लसीचा उपयोग आणि अपव्ययाच्या आधारावर केंद्र सरकार लसीचा पुरवठा करत आहे. भारताची करोनवारील लसीकरण मोहीम ही जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आधारावर आखण्यात आली आहे. ही मोहीम राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सहयोगातून चालवण्यात येत आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत ३० कोटीहून अधिक लसीचे डोस वितरीत करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने दिली.

Advertisement

करोनावरील लसीच्या वितरणात पारदर्शकता नसल्याचा आरोप मंत्रालयाने फेटाळून लावला. करोनावरील लसीच्या वितरणात पारदर्शकता नसल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. मात्र, यात काहीही तथ्य नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे. त्यामुळे जगातील देशांनी लसीकरणावर भर दिला आहे. विकसित देशांनी आपल्या देशात वेगाने लसीकरण सुरू केले आहे. दुसरीकडे अनेक गरीब देशांना अजून लसी सुद्धा मिळालेल्या नाहीत, त्यामुळे या देशात लसीकरण सुरू करता आलेले नाही. त्यातच भारताने लसींचा पुरवठा बंद केल्याने अडचणी अधिकच वाढल्या आहेत. मात्र, या देशांमध्ये सुद्धा लसीकरण होणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोरोना विरुद्धची लढाई जिंकताच येणार नाही.

Advertisement

कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता लसीकरण मोहिमेस वेग देणे आवश्यक आहे, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने भारत आणि सिरम इन्स्टिट्यूटकडे मदत मागितली आहे. सध्या अनेक देशात लसींची कमतरता आहे. त्यामुळे लसीकरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.