Take a fresh look at your lifestyle.

कोरोना अपडेट :कोरोना आटोक्यात येतोय; देशाच्या राजधानीत इतके रुग्ण सापडले…

नवी दिल्ली : कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या देशाच्या राजधानी दिल्ली शहरात आता कोरोना आटोक्यात आला आहे. मागील २४ तासात शहरात फक्त १०९ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला. येथे आता सक्रिय रुग्णांची संख्या १७६७ इतकी राहिली आहे.

Advertisement

देशभरातच आता कोरोना आटोक्यात येत आहे. कोरोना रुग्णांची वेगाने कमी होत आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. मात्र, असे असले तरी या आजाराचा धोका अजूनही कायम आहे. कारण, या विषाणूनचा फक्त प्रसार कमी झाला आहे. विषाणू अजूनही आहे. आता तर तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आणि ही लाट टाळता येणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे कोरोना नवे रुप घेऊन आधिक घातक होण्याची तयारी करत आहे. कारण, देशात काही ठिकाणी नव्या डेल्टा प्लस वेरिएंटची काही प्रकरणे सापडली आहेत. हा वेरिएंट आधीच्या डेल्टा वेरिएंटपेक्षाही जास्त संक्रामक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्या राज्यात या वेरिएंटची प्रकरणे समोर आली आहेत त्या राज्यांना केंद्र सरकारने अलर्ट केले आहे. या राज्यांनी सुद्धा त्या पद्धतीने नियोजन सुरू केले आहे.

Advertisement

दरम्यान, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता केंद्र सरकारने नियोजन केले आहे. आणि या लाटेचा सामना करण्यास सक्षम असल्याचा दावा सरकारने केला आहे. देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात तिसरी लाट आली तरी आता या लाटेचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement

तिसरी लाट आलीच तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नियोजन करण्यास सुरुवात केली. देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले. नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतील याचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यास तयार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा. 
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply