Take a fresh look at your lifestyle.

अर्र… कोरोनाने ‘त्या’ दुकानदारांना दिलाय असा झटका; पहा, किती टक्के झालेय नुकसान

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचा देशातील किराणा दुकानांवर अतिशय प्रतिकूल परिणाम झाला आहे. लहान किराणा दुकानांतील विक्री घ़टली आहे. या काळात साधारण १० ते १५ टक्क्यांपर्यंत विक्रीत घट झाली आहे. तर पहिल्या लाटेवेळी किराणा दुकानांच्या विक्रीत ६ ते ७ टक्क्यांनी वाढ झाली होती. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट खूपच घातक सिद्ध झाली. त्याचाच हा परिणाम आहे.

Advertisement

तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की कोरोनाच्या पहिली लाट आली त्यावेळी हा आजार नेमका काय आहे, याची फारशी माहिती नव्हती. त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण होते. ई-कॉमर्स कंपन्या आणि विभागीय स्टोअरकडून वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्याच वेळी, लोक घरात आवश्यक वस्तू खरेदी करुन साठवत होते. यामुळे इतर सर्व गोष्टींच्या मागणीत घट होत असताना किराणा मालाची मागणी वाढली होती.
दुसऱ्या लाटेवेळी मात्र परिस्थिती अगदी उलट होती. कोरोनाची दुसरी लाट येईपर्यंत ई-कॉमर्स कंपन्या छोट्या शहरांमध्ये आणि खेड्यात पोहोचल्या होत्या. सरकारकडून ई-कॉमर्सच्या वितरणावर कोणतेही बंधन नव्हते. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून मोठ्या स्टोअर्सना विक्री करण्याची परवानगी होती. याचा परिणाम लहान किराणा दुकानांवर झाला, ज्यामुळे विक्री कमी झाली.

Advertisement

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत, प्रत्येक कुटुंबावर आरोग्याच्या खर्चाचा ताण वाढल होता. हा खर्च पहिल्या लाटेच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी वाढला होता. त्याचा परिणाम किराणा वस्तूंवर दिसून आला. जरी यामुळे दररोज मागणी वाढली आहे. त्याच वेळी, दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण खूप वाढले होते. याचाही फटका अनेक कुटुंबांना बसला.

Advertisement

दुसर्‍या लाटेत जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती १० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढल्या. डाळी, मोहरी तेल, पाम तेलासह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ झाली. याशिवाय तांदूळ, पीठ, मीठ, कॉफी, साबण बार, बिस्किटे, डिटर्जंट पावडर आणि लिक्विडसह पेट्रोल आणि एलपीजीतील भाववाढीनेही अडचणी वाढल्या. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे शक्य नव्हते. आणि घरातील किराणा सामानाचा खर्च इत्यादीमुळे घराच्या बजेटमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान लोकांचे उत्पन्न कमी झाले ज्यामुळे वस्तूंची मागणीही कमी झाली. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणानुसार मे २०२१ मध्ये किरकोळ विक्रीत मे २०१९ च्या तुलनेत ७९ टक्क्यांची घट झाली. पश्चिम आणि उत्तर भारतात विक्रीत सर्वात मोठी घट नोंदवली गेली.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा. 

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply