Take a fresh look at your lifestyle.

… म्हणून देशाच्या आर्थिक विकासाचे मीटर राहणार डाऊन; पहा, नेमके काय म्हटलेय ‘त्या’ अहवालात

नवी दिल्ली : कोरोना काळात देशाच्या आर्थिक विकासाबाबत अनेक अहवाल आहे. जवळपास सर्वच अहवालात भारताचा आर्थिक विकासाचा दर, जीडीपी कमी राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता एसअँडपी या ग्लोबल रेटिंग संस्थेनेही चालू आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकासाच्या दरात आणखी घट केली आहे. एसअँडपी ग्लोबल रेटिंगने गुरुवारी चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) भारताच्या आर्थिक विकासाच्या वाढीचा अंदाजात कपात केली आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकासाचा दर ९.५ टक्के राहिल असा अंदाज आहे.

Advertisement

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, ही आलीच तर देशाच्या अर्थव्यवस्थेस आणखी फटका बसू शकतो. एप्रिल आणि मेमध्ये दुसऱ्या लाटेत देशात हाहाकार उडाला होता. त्यामुळे अनेक राज्यांत लॉकडाऊन केले होते. यामुळे देशातील आर्थिक घडामोडी जवळपास बंदच होत्या. परिणामी आर्थिक विकासाचा वेग कमी झाला आहे. संस्थेने म्हटले आहे, की आम्ही चालू आर्थिक वर्षात ९.५ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. मार्चमध्ये ११ टक्के अंदाज व्यक्त केला होता. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील ताळेबंदांचे कायमस्वरूपी नुकसान झाल्यास पुढील काही वर्षांत आर्थिक वाढीचा दर आणखी कमी होईल. २०२२-२३ या आर्थिक वर्षात जीडीपी ७.८ टक्क्यांनी वाढीचा अंदाज लावला आहे.

Advertisement

आतापर्यंत भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ १५ टक्के लोकांना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य लाटांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. देशात लसीकरणाचा वेग वाढवणे अत्यंत गरजेचे आहे, असे या संस्थेने स्पष्ट केले आहे. २०२०-२१ आर्थिक वर्षात कोरोना आजारामुळे भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा वेग ७.३ टक्क्यांनी कमी झाला. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये जीडीपी विकास दर ४ टक्के होता. सुरुवातीला जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात दुप्पट होता, परंतु कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे, विविध एजन्सींनी आर्थिक वाढ दराशी संबंधित पूर्वीचे अंदाजात सुधारणा करत देशाचा आर्थिक विकास आणि जीडीपी वाढीच्या दरात आणखी कपात केली आहे.

Advertisement

दरम्यान, देशात आता दुसरी लाट आटोक्यात येत आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होत असल्याने राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे दैनंदीन व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. उद्योग-कारखाने पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था वेग घेत आहे. दुसरीकडे देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुद्धा सुरू करण्यात आले आहे. याचाही परिणाम होणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा. 
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply