Take a fresh look at your lifestyle.

कोरोना काळात ‘त्याचा’ त्रास नको; नगर जिल्हा परिषदेने दिलाय ‘हा’ महत्वाचा आदेश

अहमदनगर : राज्यातील अनेक गावांमध्ये आजही दूषित पाणीपुरवठा होत आहे. प्रत्येक गावास शुद्ध पाणीपुरवठा करणे अद्यापही शक्य झालेले नाही. नगर जिल्ह्यातही काही गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणी नमुने घेऊन तपासणी केली असता अनेक गावातील पाणी दुषित आढळते. आता तर पावसाळा सुरू झाला आहे. या काळात दुषित पाण्यामुळे अनेक आजार उद्भवतात. कोरोना काळात असे आजार उद्भवणे परवडणारे नाही, त्यामुळे दुषित पाणी असणाऱ्या गावांचा आढावा घेऊन त्याठिकाणी तत्काळ आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आदेश नगर जिल्हा परिषदेने दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत हे आदेश देण्यात आले.

Advertisement

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आणि भूजल सर्वेक्षण विभागाकडून विविध गावांमधील पाण्याचे नमुने गोळा करुन तपासणी करण्यात येते. या विभागाकडून दर महिन्याला जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांतील नमुने घेतले जातात. या पाण्याची प्रयोगशाळेत जैविक तपासणी करण्यात येते. या तपासणीत दरवेळी काही गावांतील पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून येते. त्यानंतर पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या जातात. परंतु, आजही जिल्ह्यात शंभर टक्के शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. या पाणी स्त्रोतांतील पाणी दूषित असेल तर येथे उपाययोजना केल्या जातात. मात्र, त्यानंतर या स्त्रोताद्वारे नियमित शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल, यासाठी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे या स्त्रोतांतील पाणी पुन्हा दूषित होत असल्याचा अनुभव आहे.

Advertisement

पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाणी पिल्याने साथीचे अनेक रोग पसरण्याची भिती असते. याआधीही असे प्रकार घडले आहेत. आता तर कोरोनाचा आजार आला आहे. पावसाळ्यात कोरोनाचा धोका वाढण्याचीही भिती आहे. तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे प्रतिकार शक्ती कमी करणारे साथीचे आजार उद्भवणे परवडणारे नाही. त्यामुळे दुषित पाणी आढळणाऱ्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

Advertisement

या व्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरही या सभेत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना आजाराचा आढावा घेण्यात आला. संभाव्य तिसऱ्या लाटेस रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घ्यावी, योग्य नियोजन करावे, अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आला. जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा यावेळी घेण्यात आला. या सभेस आरोग्य विभागाचे अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा. 

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply