Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाच्या संकटाचे आव्हान कायम; मुख्यमंत्र्यांना दिल्यात ‘या’ महत्वाच्या सूचना; केंद्र सरकारनेही केले ‘अलर्ट’

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होत असताना आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच राज्यात काही ठिकाणी ‘डेल्टा प्लस’ या अतिशय घातक वेरिएंटचेही रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे केंद्राने सुद्धा राज्यास अलर्ट केले आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काही महत्वाचे आदेश दिले आहेत.

Advertisement

करोना संसर्गाची दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि आता आपणास तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. ‘डेल्टा प्लस’ या वेरिएंटचा देखील धोका आहे. हे सगळे लक्षात ठेवून व संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स पाहिजेत. फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील, याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांत नियोजन करून द्यावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

Advertisement

कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता होती. म्हणून सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आतापासून करून ठेवावा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधे व इतर आवश्यक वैद्यकीय सामग्री उपलब्ध राहील, असे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, याआधीही मुख्यमंत्र्यांनी संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. कोविड संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेस सामोरे जाताना किती औषधे, ऑक्सिजन आवश्यक आहे, याचे नियोजन करा. दररोज 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दीष्ट पूर्णत्वास नेताना राज्याची ऑक्सिजन निर्मिती क्षमता वेगाने वाढवावी. राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राची जी बांधकामे प्रगतीपथावर आहेत, ती आधी पूर्ण करावी. जुलैअखेर पर्यंत मंजुरी दिलेले ऑक्सिजन प्रकल्प उभे राहतील याकडे लक्ष द्यावे, अशा महत्वाच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

Advertisement

देशात तिसऱ्या लाटेचा धोका आहे. लाट कधी येईल याबाबत निश्चित माहिती नसली नाही. काही तज्ञ ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येणार असल्याचे सांगत आहेत तर काहींच्या मते नोव्हेंबरमध्ये येऊ शकते. ते काही असले तरी राज्यांनी नियोजन सुरू केले आहे.

Advertisement

कोविड संसर्ग पाहता राज्यात अनेक ठिकाणी तात्पुरता स्वरूपात आरोग्य सुविधा सुरू केल्या आहेत. याबाबत आराखडा तयार करावा. आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधा आणि आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी तरतूद करावी, अशा काही महत्वाच्या सूचना त्यांनी आढावा बैठकीत दिल्या होत्या.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply