Take a fresh look at your lifestyle.

छंदातून धंदा..! ‘ही’ दोन रुपयांची नोट मिळवून देईल लाखो रुपये, पहा कशी विकता येणार..?

मुंबई : प्रत्येकालाच आयुष्यात काही ना काही छंद असतो. काही जण जुन्या वस्तू सांभाळून ठेवतात, तर काही जणांना जुनी नाणी, जुन्या नोटा जमवण्याचा छंद असतो. मात्र, हा छंदही तुम्हाला लखपती बनवू शकतो. कारण काही वेबसाईटवर अशा जुन्या वस्तू, नाणी किंवा नोटांचा लिलाव होतो. त्यातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतात. अशाच एका जुन्या 2 रुपयांच्या जुन्या नोटेपासून तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता.

Advertisement

आपल्या लहानपणी अनेकांनी एक-दोन रुपयांच्या नोटा पहिल्या असतील. काळाच्या ओघात या नोटा मागे पडल्या. आता तर त्या चलनातही नाहीत. त्यांची छपाईही बंद झाली आहे. मात्र, अनेकांच्या मनात या नोटांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. काही जणांनी अशा काही नोटा जपून ठेवल्या आहेत. अशा नोटा दुर्मिळ झाल्या आहेत.

Advertisement

काही वेबसाईट्सवर अशा जुन्या नोटांचा लिलाव होतो. आठवण म्हणून तुमच्या जवळ अशी एखादी नोट असेल, तर तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतील. अशाच एका दोन रुपयाच्या नोटेसाठी लोक लाखो रुपये देण्यास तयार आहेत. या नोटेवर 786 हा क्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच या नोटेचा रंग गुलाबी आणि त्यावर ‘आरबीआय’चे माजी गव्हर्नर मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांची सहीसुद्धा असायला हवी.

Advertisement

तुमच्याकडे ही नोट असेल, तर घरबसल्या तुम्ही तिचा लिलाव करू शकता. ईबे (Ebay) आणि ‘क्लिक इंडिया’ (Click India) या वेबसाइट्सवर अशा जुन्या नोटांचा लिलाव होतो. विक्रेता म्हणून या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. तुमच्याजवळील ‘अँटिक करन्सी नोटे’चा फोटो त्यावर अपलोड केला, की ग्राहक थेट तुमच्याशी संपर्क साधतील. तुम्ही हव्या त्या किमतीला ही नोट विकू शकता..!

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.