Take a fresh look at your lifestyle.

तयार आहात ना… आता ‘या’ दिवशी येणार जियोचा 5G स्मार्टफोन; पहा, काय आहेत फीचर्स

नवी दिल्ली : देशातील आघाडीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. देशातील नागरिक रिलायन्सच्या ५ जी स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज अंबानी यांनी याबाबत मोठी घोषणा केली. रिलायन्स आणि गुगलने मिळून ५ जी स्मार्टफोन तयार केला असून येत्या १० सप्टेंबर रोजी हा फोन लाँच करण्यात येणार आहे, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

Advertisement

हा देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन ठरण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटचा वेग जास्त असेल. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन आयुष्यात आणि कामकाजाच्या पद्धतीत मोठे बदल होतील, असा दावा यावेळी गुगलचे सीईओ सुंदर पिचाईल यांनी केला. ‘जियो फोन नेक्स्ट’ या स्मार्टफोनची किंमती किती असेल, याबाबत रिलायन्सकडून खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, जाणकारांच्या अंदाजानुसार या स्मार्टफोनची किंमत साधारण 4000 रुपयांच्या आसपास असेल. जिओ-गुगलाच हा अँड्रॉईड स्मार्टफोन गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

Advertisement

भारतास आता 2 जी मुक्त करणार असल्याचे सांगितले. 5 जी इकोसिस्टम विकसित करण्यासाठी बाजारपेठेत 5 जी ला सपोर्ट करणारी उपकरणे आली पाहिजेत. त्यासाठी रिलायन्स आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत मिळून काम करत आहे. रिलायन्स जिओमुळे भारताला फक्त 5 जी तंत्रज्ञानच मिळणार नाही तर देश 2 जी मुक्त होणार असल्याचा दावा मुकेश अंबानी यांनी केला. रिलायन्स जिओ हे सध्याच्या घडीला जगातील दुसऱ्या क्रमांकाचे नेटवर्क आहे. रिलायन्स जिओच्या माध्यमातून दर महिन्याला ६३० कोटी जीबी डेटा वापरला जातो. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४५ टक्क्यांनी वाढल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

Advertisement

या व्यतिरिक्त अंबानी यांनी सभेत अन्य काही महत्वाच्या घोषणा केल्या. गुजरात राज्यातील जामनगर येथे पाच हजार एकर जागेवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, या कामास सुरुवात झाली आहे. यावर्षी शैक्षणिक सत्र जिओ इन्स्टिट्यूट सुरू करण्यात येणार आहे. रिलायन्समध्ये कार्यरत असलेले कर्मचारी, निवृत्त कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे कंपनी मोफत लसीकरण करणार आहे, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा. 

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply